फटाके फोडण्यावरून झालेल्या भांडणात सासूचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2020 02:35 PM2020-11-15T14:35:36+5:302020-11-15T14:36:52+5:30

सिध्दार्थ नगर भागात तू माझ्याजवळ फटाके का फोडत आहे? या कारणावरून आरोपीने हुज्जत घालत उपस्थित केलेल्या भांडणात सासूबाईचा विनयभंग केला

Mother-in-law molested in quarrel over firecrackers | फटाके फोडण्यावरून झालेल्या भांडणात सासूचा विनयभंग

फटाके फोडण्यावरून झालेल्या भांडणात सासूचा विनयभंग

googlenewsNext
ठळक मुद्देसुनेच्या मानेवर विळ्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्नरावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलआरोपी घटनास्थळावरून फरार


रावेर : शहरातील सिध्दार्थ नगर भागात तू माझ्याजवळ फटाके का फोडत आहे? या कारणावरून आरोपीने हुज्जत घालत उपस्थित केलेल्या भांडणात सासूबाईचा विनयभंग केला, तर तिच्या सूनेच्या मानेवर व हातावर विळ्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना दिवाळीच्या संध्येला घडली. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असूनल आरोपी फरार झाला आहे.
रावेर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सिध्दार्थ नगरमधील आकाश दीपक शिरतुरे हे त्यांच्या घरासमोर फटाके फोडत होते. तेव्हा आरोपी अजय विजय मेढे उर्फ भद्रकाली रा.बौद्धवाडा याने तू माझ्याजवळ येवून फटाके का फोडत आहेस? यासंबंधी जाब विचारला व आकाश शिरतुरे यांच्याशी हुज्जत घातल्याने वादविवाद झाला. त्याचे पर्यावसान भांडणात झाले.
दरम्यान, आकाश शिरतुरे यांची आई हे भांडण सोडवण्यासाठी गेली असता आरोपी अजय उर्फ भद्रकाली याने तिचा विनयभंग केला व आकाश शिरतुरे याच्या घरात घुसून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याचवेळी आकाश शिरतुरे यांच्या पत्नी राखी शिरतुरे या भांडण सोडवण्यासाठी आल्या असता त्याच्याच घरातील बख्खी (विळा) घेऊन आरोपी अजय उर्फ भद्रकाली याने राखी शिरतुरे यांच्या मानेवर व हातावर विळ्याचा वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी घडली.
या आशयाची फिर्याद राखी आकाश शिरतुरे यांनी दिली. त्यावरून अजय विजय मेढे उर्फ भद्रकाली याच्याविरूद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरून आरोपी पसार झाला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक करीत आहेत.

Web Title: Mother-in-law molested in quarrel over firecrackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.