श्रीराम मंदिर भूमिपूजनाचा क्षण विश्वासाठी आनंद देणारा सूर्योदय ठरेल : आचार्य जनार्दन महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 08:11 PM2020-08-05T20:11:33+5:302020-08-05T20:11:51+5:30

गेल्या अनेक वर्षांपासूूनची प्रतीक्षा असलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिर भूमिपूजनाचा क्षण सर्व विश्वासाठी आनंद उत्साह व एक दिशा देणारा नवीन सूर्योदय ठरेल, अशी प्रतिक्रिया थेट अयोध्येवरून सतपंथ संस्थांचे गादीपती महामंडलेश्वर आचार्य जनार्दन महाराज यांनी दिली.

The moment of Bhumi Pujan at Shriram Temple will be a joyous sunrise for the faith | श्रीराम मंदिर भूमिपूजनाचा क्षण विश्वासाठी आनंद देणारा सूर्योदय ठरेल : आचार्य जनार्दन महाराज

श्रीराम मंदिर भूमिपूजनाचा क्षण विश्वासाठी आनंद देणारा सूर्योदय ठरेल : आचार्य जनार्दन महाराज

googlenewsNext
ठळक मुद्देऐतिहासिक घटनेचे साक्षीदार झाले आचार्य जनार्दन महाराज

वासुदेव सरोदे
फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : गेल्या अनेक वर्षांपासूूनची प्रतीक्षा असलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिर भूमिपूजनाचा क्षण सर्व विश्वासाठी आनंद उत्साह व एक दिशा देणारा नवीन सूर्योदय ठरेल, अशी प्रतिक्रिया थेट अयोध्येवरून सतपंथ संस्थांचे गादीपती महामंडलेश्वर आचार्य जनार्दन महाराज (फैजपूर) यांनी दिली.
यावेळी त्यांनी हा ऐतिहासिक व रोमांचकारी क्षण अनुभवायला मिळाला त्याबद्दल श्रीराम मंदिर ट्रस्टला साधुवाद दिले. यावेळी ट्रस्टतर्फे त्यांचा चांदीचे नाणे स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
गेल्या चार दिवसांपासून आचार्य जनार्दन महाराज अयोध्येत आहेत.यावेळी त्यांनी माहिती देताना सांगितले की, जसजसा भूमिपूजनाचा क्षण जवळ येत होता तसतसा अंगावर रोमांच येत होता. कार्यक्रमस्थळी एक ते दीड तास आधी स्थानापन्न व्हावे लागले होते. साधू-संत व महंतांची एक वेगळीच प्रतिष्ठा असते मात्र भूमिपूजन स्थळी येणारे साधूसंत आपली पद, प्रतिष्ठा विसरून मानसन्मान दूर ठेवत कार्यक्रमात सहभागी होत होते. कारण प्रसंगच सर्वांचे आराध्य व श्रद्धास्थान असलेल्या श्रीराम मंदिर भूमिपूजनाचा होता.
कार्यक्रमस्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीराम मंदिर भूमिपूजन ज्या ठिकाणी होवून श्रीराम विराजमान होणार आहेत या स्थळाला साष्टांग दंडवत करत तेथील माती आपल्या मस्तकाला लावली. त्या वेळी उपस्थित सर्व संत-महंत यांच्या डोळ्यांत पाणी तरारले व सर्वांनी उभे राहत टाळ्यांचा गजर करीत पंतप्रधान मोदी यांना अभिवादन केल्याचेही आचार्य जनार्दन महाराज यांनी सांगितले.
संतांच्या भेटी ट्रस्टकडून सन्मान
भूमिपूजनप्रसंगी उपस्थित संतांचा श्रीराम मंदिर ट्रस्टतर्फे चांदीचे नाणे देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थित सर्व संत महंत यांच्या भेटी घेऊन त्यांची आस्थेने विचारपूस केली.
यावेळी योगगुरू बाबा रामदेव, जुना पीठाधीश्वर आचार्य अवधेशानंदगिरी, आचार्य महासभेचे मंत्री परमानंदजी महाराज राजकोट व अन्य साधुसंतांच्या भेटी झाल्याचेही जनार्दन महाराज यांनी सांगितले.

Web Title: The moment of Bhumi Pujan at Shriram Temple will be a joyous sunrise for the faith

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.