वेगवेगळ्या घटनेतील मोबाईल चोरटे ताब्यात, लोहमार्ग पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 03:53 PM2020-09-17T15:53:48+5:302020-09-17T15:54:05+5:30

लोहमार्ग पोलीस सातत्याने प्रवासादरम्यान होणाऱ्या चोऱ्यांंवर लक्ष ठेवून आहेत. चोरट्यांवर कारवाई करीत असून वेगवेगळ्या घटनेतील मोबाईल चोरटे जेरबंद करण्यात आले आहेत.

Mobile thieves arrested in various incidents, action taken by Railway Police | वेगवेगळ्या घटनेतील मोबाईल चोरटे ताब्यात, लोहमार्ग पोलिसांची कारवाई

वेगवेगळ्या घटनेतील मोबाईल चोरटे ताब्यात, लोहमार्ग पोलिसांची कारवाई

Next




भुसावळ : लोहमार्ग पोलीस सातत्याने प्रवासादरम्यान होणाऱ्या चोऱ्यांंवर लक्ष ठेवून आहेत. चोरट्यांवर कारवाई करीत असून वेगवेगळ्या घटनेतील मोबाईल चोरटे जेरबंद करण्यात आले आहेत.
रेल्वे प्रवासात रेल्वे प्रवाशाचे लक्ष नसताना तसेच दरवाजाजवळ उभे असताना काठीने हातावर मारहाण करीत मोबाईल लांबवण्याच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर गोपनीय माहितीनुसार, लोहमार्ग पोलिसांनी दोघा आरोपींच्या ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीला गेलेले दोन मोबाईल जप्त केले आहेत. तसेच एका गुन्ह्यात जप्त मोबाईल न्यायालयाच्या आदेशाने तक्रारदाराला परत देण्यात आला. दरम्यान, रेल्वे
प्रवासात होणाºया चोºया पाहता लोहमार्ग पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अप ११०५८ पठाणकोट एक्स्प्रेसने भुसावळ ते जळगाव प्रवास करीत असलेल्या नीलेश जगन्नाथ वाणी (संतोषी डेअरीजवळ, जळगाव) आऊटरजवळ गाडी आली असता आरोपी राहुल देवीदास तायडे (शेगाव, जि.बुलढाणा) याने हाताला काठी मारत ५८ हजार रुपये किमतीचा मोबाईल लांबवला होता. आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्या ताब्यातून मोबाईल जप्त केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार तो तक्रारदार वाणी यांना नुकताच परत करण्यात आला.
अहमदाबाद-यशवंतपूरच्या एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक चारमधील बर्थ क्रमांक ५६ वरून नंदुरबार ते जळगाव प्रवासी करीत असलेल्या अतुल रामदास बठेजा (आदर्श नगर, सिंधी कॉलनी, भुसावळ) हे जळगाव येथे उतरत असताना चोरट्यांनी ३० हजार रुपये किमतीचा मोबाईल लांबवला होता. १४ सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी विनोद मोरेश्वर ईडी (४७, खालचे गाव, ब्रह्मटेक, बालाजी मंदिरामागे, शिरपूर, जि.धुळे) या आरोपीस अटक करण्यात आली असून, त्याच्या ताब्यातून मोबाईल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय नितीन न्हावकर, हवालदार नितीन पाटील, भरत शिरसाठ यांनी केली.
भुसावळ रेल्वे स्थानकावरील तिकीट बुकींग खिडकीवर तिकीट काढण्यासाठी तक्रारदार आशा प्रकाश रंभाळे (२५, धम्मदीपनगर, विश्वशांती बुद्धनगरजवळ, नागपूर) या ६ जानेवारी रोजी आल्या असता चोरट्यांनी त्यांचा १० हजार ५०० रुपये किमतीचा मोबाईल लांबवला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपी देवेंद्र खुशाल भगतकर (२१, गुप्ताचौक, नागपूर) यास नागपूर येथून अटक करण्यात आली व आरोपीच्या ताब्यातून मोबाईल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मनीषा गजभिये, कॉन्स्टेबल आशू शेट्टीयार, कॉन्स्टेबल अमरदीप डोंगरे यांनी केली.

Web Title: Mobile thieves arrested in various incidents, action taken by Railway Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.