दांडी यात्रेच्या सजीव देखाव्यातून गांधींजींच्या आठवणींना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 06:45 PM2020-01-30T18:45:02+5:302020-01-30T18:45:44+5:30

पुण्यतिथी : विविध कार्यक्रमातून शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी केले अभिवादन

The memories of Gandhiji come to light with the lively look of the Dandi Yatra | दांडी यात्रेच्या सजीव देखाव्यातून गांधींजींच्या आठवणींना उजाळा

दांडी यात्रेच्या सजीव देखाव्यातून गांधींजींच्या आठवणींना उजाळा

googlenewsNext

जळगाव- शहरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये महात्मा गांधी यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली़ तर महात्मा गांधी यांच्या जीवन कार्याची माहिती देवून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी गांधीजींची वेशभूषा साकारत दांडी यात्रेचा सजीव देखावा साकारला होता़ या देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

राज प्राथमिक विद्यालय
मेहरूण येथील राज प्राथमिक विद्यालयात हुतात्मा दिन व महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली़ विद्यालयाचे उपशिक्षक केतन बºहाटे यांनी प्रतिमेचे पूजन केले़ तसेच मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील यांनी गांधींजींच्या जीवन कार्याची माहिती दिली़ विवेक पाटील, हरी पवार, लकी चौधरी या विद्यार्थ्यांनी भाषणे केली़ सूत्रसंचालन ज्ञानचंद बºहाटे यांनी केले तर आभार संदीप खंडारे मानले़

रत्ना जैन विद्यालय
प्रताप नगरातील रत्ना जैन विद्यालयात महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी झाली़ शाळेच्या मुख्याध्यापिका आशा साळुंखे यांच्याहस्ते मार्ल्यापण झाले़ नंतर महात्मा गांधी यांच्या कायाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली़ सूत्रसंचालन चित्रा चौधरी यांनी केले तर आभार सुरेश न्हावी यांनी मानले.

कमल वाणी विद्यानिकेतन
कमल राजाराम वाणी विद्यालयात मुख्याध्यापक रवींद्र माळी व नीलेश नाईक यांच्याहस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले़ नंतर इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची वकृत्व स्पर्धा घेण्यात आली आहे़ त्यात यश खैरनार याने प्रथम क्रमांक पटकाविला तर उपलक्ष पाटील द्वितीय आणि रेहान कुरेशी व खुशबू सैनी हे उत्तेजनार्थ ठरले़ सूत्रसंचालन साक्षी पुर्विया या विद्यार्थिनीने केले तर स्पर्धेचे परीक्षण नरेंद्र वारके यांनी केले़.

मानव सेवा विद्यालय
मानवसेवा विद्यालयात दांडी यात्रेचा देखावा बनवून महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आले़ कार्यक्रमात मुख्याध्यापिका प्रतिमा सूर्यवंशी यांनी प्रतिमेचे पूजन केले़ त्यानंतर इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध सुविचार अर्थासहीत सांगितले़ त्यानंतर महात्मा गांधी यांची वेशभूषा साकारून दांडी यात्रेचा सजीव देखावा उपस्थित विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला.

खुबचंद सागरमल विद्यालय
शिवाजीनगरातील खुबचंद सागरमल विद्यालयात मुख्याध्यापक सतिश साळुंखे यांच्याहस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले़ याप्रसंगी पर्यवेक्षक सुरेश आदीवाल यांचीउपस्थिती होती़ विद्यार्थ्यांनी रघुपती राघव, दे दी हमैं आझादी यासह अनेक गीते सादर केली़ सूत्रसंचालन एल़एऩ महाजन यांनी केले़ कार्यक्रमाला मंगला सपकाळे, उज्ज्वला गोहिल, कल्पना देवरे, राजेश इंगळे, भास्कर कोळी, विजय पवार, संतोष चौधरी, अजय पाटील, प्रवीण पाटील, लिखिता बोरसे, मयूर पाटील, राहुल देशमुख आदींची उपस्थिती होती.

सद्गुरू विद्यालय
सद्गुरू एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक विद्यामंदिरात मुख्याध्यापिका गायत्री भंगाळे यांच्याहस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले़ नंतर विद्यार्थ्यांनी भाषणे केली़ उपशिक्षक गणेश लोडते, भूषण जोगी, लिलाधर नारखेडे आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले़ सूत्रसंचालन शिल्पा झोपे यांनी केले तर आभार पूनम चौधरी यांनी मानले़ यशस्वीतेसाठी जावेद तडवी, सोपान पाटील, प्रमोद चौधरी, ज्योती महाले, सविता चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

जय दुर्गा माध्यमिक विद्यालय
जय दुर्गा माध्यमिक विद्यालयात महात्मा गांधी पुण्यतिथी व हुतात्मा दिवस साजरा करण्यात आला़ ज्योती पाटील यांच्याहस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले़ त्यानंतर हर्षा दहिभाते, ओम शिंपी, उमेश शिंपी, उमेश मोरे, विद्या नाईक, रोहिणी अहिरे, प्रियंका राठोड, श्वेता बिºहाडे, राजेश तवर, पल्लवी चौहान या विद्यार्थ्यांनी भाषणे केली़ महेंद्र पाटील यांनी गांधींजींच्या जीवन कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली़ तर कार्यक्रमाला सविता पाटील, शरद पाटील, स्रेहल तडवी, मिलिंद डांगरे, नलिनी नेटके आदींची उपस्थिती होती़ तर जय दुर्गा प्राथमिक विद्यालयातही पुणतिथीनिमित्त कार्यक्रम झाला़ अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सागर कोल्हे होते़ तर स्वप्निल पाटील यांनी गांधीजींच्या जीवन कार्याची माहिती दिली़ सूत्रसंचालन महेश बच्छाव यांनी केले तर आभार पुरूषोत्तम चिमणकर यांनी मानले.

सरस्वती विद्यामंदिर
सरस्वती विद्या मंदिरमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आले. तसेच हुतात्मा स्वतंत्र सेनानींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना वसाने यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले़ यावेळी मनोज पाटील यांनी विद्यार्थ्यांना कुष्ठरोगा विषयी मार्गदर्शन केले़ तर सुवर्णलता अडकमोल यांनी महात्मा गांधी जीवन कार्याची माहिती दिली़ यशस्वीतेसाठी सविता ठाकरे, निलिमा भारंबे, उज्जवला ब्रम्हांकर, सुदर्शन पाटील, मयुर कणखर यांनी परिश्रम घेतले.

 

Web Title: The memories of Gandhiji come to light with the lively look of the Dandi Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.