वरणगाव पालिकेची सभा ठरली वादळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 10:08 PM2020-01-13T22:08:22+5:302020-01-13T22:10:41+5:30

सभेसमोर मंजुरी न घेता निविदा काढल्याच्या मुद्यावरून वरणगाव पालिकेची सभा गाजली.

The meeting of the Varanga Municipality was stormy | वरणगाव पालिकेची सभा ठरली वादळी

वरणगाव पालिकेची सभा ठरली वादळी

Next
ठळक मुद्देनगराध्यक्ष पडले एकाकीअनेक विषय बारगळलेचाळीसपैकी २२ विषय नामंजूर

वरणगाव, ता.भुसावळ, जि.जळगाव : सभेसमोर मंजुरी न घेता निविदा काढल्याच्या मुद्यावरून वरणगाव पालिकेची सभा गाजली. यावेळी नगराध्यक्ष एकाकी पडल्याने सभेत गोंधळ उडाला. सभेच्या पटलावर अनेक विषयांवरील ठराव बारगळले. यावेळी विविध ४० विषयांपैकी २२ विषय नामंजूर झाले. येथील पालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी झाली. नगराध्यक्ष सुनील काळे अध्यक्षस्थानी होते.
पालिकेच्या सभागृहात आयोजित या सभेला मुख्याधिकारी श्यामकुमार गोसावी, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, नगरसेवक राजेंद चौधरी, रवींद्र सोनवणे, गणेश चौधरी, विष्णू खोले, सुधाकर जावळे, बबलू माळी, गणेश धनगर, विकीन भंगाळे, विनोद चौधरी, नगरसेविका अरुणाबाई इंगळे, रोहीणी जावळे, जागृती बढे, मेहनाजबी पिंजारी, नरसीमबी कुरेशी, माला मेढे, प्रतिभा चौधरी, शशी कोलते, वैशाली देशमुख उपस्थित होते.
यावेळी सभेच्या पटलावर ४० विषय ठेवण्यात आले होते. परंतु काही विषयांमध्ये सभेसमोर मंजुरी न घेता निविदा काढण्यात आल्या व कार्यारंंभ आदेश देण्यात आले. तसेच टिप्पणीमध्ये मुख्याधिकारी गोसावी यांनी या विषयाला मंजुरी द्यावी अशा प्रकारची टिपणी दिल्याने यावेळी सर्व नगरसेवक एका बाजूला तर नगराध्यक्ष व मुख्याधिकारी एका बाजूला पडल्याचे निदर्शनास आले.
सीसीटीव्ही कॅमेरे नगरपरिषदेत बसवणे, इंटरकॉम मशीन व वायरिंग इन्स्टॉलेशन नगरपरिषद संकेतस्थळ तयार करणे, स्वच्छ सर्वेक्षण २०२०च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उत्तम तंत्रज्ञानाचा वापर करणे, स्वच्छ सर्वेक्षण अभियानांंतर्गत कापडी पिशव्या पुरवणे, नालेसफाई करणे, कंपोस्ट युनिट पुरवणे, प्रिन्सेस स्टिकर पुरवणे, सुशोभीकरणासाठी छत्र्या, कुलर खरेदी करणे, जीपीएस सिस्टीम बसवणे, वरणगाव रेल्वेस्टेशन कॉलनीला पाणीपुरवठा करणे, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मैला प्रक्रिया केंद्र बांधण्याबाबत ई टॉयलेट खरेदी करणे, पथदिवे नियंत्रण करणे, पोलीस स्टेशनला सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीला वॉटर एटीएमसाठी जागा देणे, शहरात महिला व पुरुषांना फायबर मुतारी खरेदी करणे यासह इतर विषय नामंजूर करण्यात आले. यामध्ये काही विषयांच्या कामांच्या निविदा काढून कार्यारंभ आदेश देण्यात आले आहे. परंतु सभागृहाची मंजुरी न घेतल्याने या कामांना सभागृहाने मंजुरी दिली नाही.

Web Title: The meeting of the Varanga Municipality was stormy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.