परिचय मेळाव्यातच जुळला विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 10:36 PM2019-11-18T22:36:52+5:302019-11-18T22:37:10+5:30

जळगाव : संताजी जगनाडे महाराज बहुद्देशीय संस्थेतर्फे आयोजित दुसऱ्या युवक-युवती, पालक परिचय मेळाव्यात मेळावा सुरू होण्यापुर्वीच एक विवाह जुळला़ ...

 Marriage matched only during the introduction | परिचय मेळाव्यातच जुळला विवाह

परिचय मेळाव्यातच जुळला विवाह

Next

जळगाव : संताजी जगनाडे महाराज बहुद्देशीय संस्थेतर्फे आयोजित दुसऱ्या युवक-युवती, पालक परिचय मेळाव्यात मेळावा सुरू होण्यापुर्वीच एक विवाह जुळला़ या मेळाव्यात १९०५ युवक-युवतींनी परिचय करून दिला. हजारो समाजबांधवांच्या उपस्थितीत गुळवे हायस्कूलच्या प्रांगणात हा मेळावा रविवारी पार पडला़
अध्यक्षस्थानी धरण्गावचे माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी हे होते़ उद्घाटन आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते करण्यात आले़ मेळावा सुरू होण्यापूर्वीच सागर ठाकरे व ललिता चौधरी यांचा विवाह जुळला. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला़
यावेळी नगरसेवक राजेंद्र चौधरी (चाळीसगाव) युवराज करनकाळ (धुळे), जीवन चौधरी (चोपडा), माजी महापौर विष्णू भंगाळे, नामदेव चौधरी, विजय चौधरी, नगरसेविका ज्योती तायडे, मंगला चौधरी, शोभा चौधरी, निर्मला चौधरी, सुनंदा चौधरी, भगवान चौधरी, रामचंद्र चौधरी, संतोष चौधरी, भगवान चौधरी, संजय चौधरी, के़ डी़ चौधरी, डॉ ़ मनिलाल चौधरी, नंदू चौधरी, सुरज चौधरी, अभिमन्यू चौधरी, जे़ बी. चौधरी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रतन थोरात यांनी तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत सुरळ्कर यांनी मानले़
यावेळी परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले़
आई-वडिलांचा सांभाळ करा
आमदार सुरेश भोळे यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. आगामी काळात परिचय मेळाव्या ऐवजी विवाह मेळावा घेण्याचा मानस अध्यक्ष चौधरी यांनी व्यक्त केला़

 

Web Title:  Marriage matched only during the introduction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.