माणसाने माणसाशी माणसासम वागणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 10:33 PM2020-03-25T22:33:08+5:302020-03-25T22:33:26+5:30

ज्ञानाद्वारे आमच्या जीवनात बदल घडावा आणि स्वत:ला त्यासाठी पात्र बनवायला हवे. सामाजिक रूपातही जरी आपण दिसायला मानवी पुतळ्यासारखे मानव ...

Man to man to man | माणसाने माणसाशी माणसासम वागणे

माणसाने माणसाशी माणसासम वागणे

Next

ज्ञानाद्वारे आमच्या जीवनात बदल घडावा आणि स्वत:ला त्यासाठी पात्र बनवायला हवे. सामाजिक रूपातही जरी आपण दिसायला मानवी पुतळ्यासारखे मानव आहोत. आगपेटीच्या खूप काड्या असतील तर त्यापासून आपण काय काय करू शकतो, एका काडीने आपण दिवा लावू शकतो आणि त्याच काडीने आपण घरही जाळू शकतो. दिसायला त्यात सगळ्या काड्याच आहेत, पण कार्य काय करत आहोत? फरक पडतो तो हेतूचा. आपण सर्वांनी स्वत:ला मानवी गुणांनी युक्त करायचे आहे. कोणासाठीही कसलाही विपरीत असा विचार बाळगायचा नाही. जात-पात पहायची नाही. सर्वांना या परमात्म्यानेच बनवले आहे. आपल्यासारखाच समोरच्याचाही आदर करायला शिकलो पाहिजे. याठिकाणी सेवेच्या मैदानातही किंवा कुठेही पदांशी जोडले जायचे नाही. आपण स्वत:ला दासभावनेत ठेवायचे आहे. आमच्या मनाचा जो भाव आहे तो दासभावच असायला हवा.
पहायला गेले तर घरांमध्ये आपल्या जगामध्ये सगळेत काही ना काही करत आहोत. जर काही प्राप्त करत असतील तरी ती आमची उपलब्धी आहे. त्याबरोबर एक विनयशीलता आणि विनम्रतेची भावनाही असावी की, आम्ही जे काही आहोत ते ईश्वर कृपेमुळेच आहोत. अनेक महात्मा लोकांनी आपल्याला चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्या आपल्या जीवनात उतरावयाच्या आहेत. त्याचबरोबर केवळ आपल्यापर्यंत सीमित न ठेवता हा ज्ञानरूपी प्रकाश जेवढ्यांना देता येईल. त्यांनाही ही ऊर्जा आणि प्रेरणा द्यायची आहे. पण ही प्रेरणा कशी द्यायची?
जिथे गरज आहे तिथे बोलायचेही आहे. परंतु त्या अगोदर आपल्या बुद्धीमध्ये, विचारांमध्ये व्यवहारांमध्ये अंगीकार करून, गोड वाणीद्वारे कोणाचे मन न दुखवता. केवळ अश्रू पुसत आणि शक्य तितके आपण इतरांच्या जीवनाला दिलासा देण्याचा प्रयत्न करु या...
- संकलन - अनिल जोशी, संत निरंकारी मंडळ, जळगाव.

 

Web Title: Man to man to man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव