धरणगाव नगराध्यक्ष पोटनिवडणूक माघारीचा आज शेवटचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 11:13 PM2019-12-17T23:13:27+5:302019-12-17T23:15:28+5:30

धरणगाव पालिकेच्या दि.२९ रोजी होत असलेल्या नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांनी भरलेल्या अर्जांच्या माघारीचा दि.१८ हा शेवटचा दिवस आहे.

Last day of withdrawal of election by Dhangaon city chief | धरणगाव नगराध्यक्ष पोटनिवडणूक माघारीचा आज शेवटचा दिवस

धरणगाव नगराध्यक्ष पोटनिवडणूक माघारीचा आज शेवटचा दिवस

Next
ठळक मुद्दे२० उमेदवारांपैकी माघार कुणा-कुणाची?राजकीय पक्षांची सेना उमेदवाराला अपक्ष लढविण्याची "शाळा" यशस्वी होणार का?

धरणगाव, जि.जळगाव : धरणगाव पालिकेच्या दि.२९ रोजी होत असलेल्या नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांनी भरलेल्या अर्जांच्या माघारीचा दि.१८ हा शेवटचा दिवस आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीसह २० उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहे. या उमेदवारी दाखल केलेल्या उमेदवारांपैकी कोण-कोण माघार घेईल याकडे शहरवाशीयांच्या नजरा लागल्या आहेत, तर शिवसेनेच्या उमेदवाराला अपक्ष लढण्याची आॅफर आल्याची चर्चा शहरात आहे. राजकीय पक्षांची ही ‘शाळा’ यशस्वी होईल का? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे.
धरणगाव येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी २० उमेदवारी अर्ज दाखल आहेत. दि.१८ रोजी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. सर्वच राजकीय पक्षांनी पसंतीक्रमानुसार दोन-दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. त्यात शिवसेनेतर्फे नीलेश सुरेश चौधरी, राजेंद्र महाजन, भाजपतर्फे मधुकर माळी (रोकडे), संजय महाजन, राष्ट्रवादीतर्फे नीलेश भागवत चौधरी, दीपक आनंदा वाघमारे, काँग्रेसतर्फे दीपक जाधव यांना एबी फॉर्म देण्यात आले आहे. या निवडणुकीसाठी सोयीनुसार शाळा होत असल्याची चर्चा आहे. सर्वच राजकीय पक्ष आपापल्या पध्दतीने सोयीच्या खेळी करण्याचा प्रयत्न करीत आहे.
दाखल नामनिर्देशन पत्र असे-- नीलेश भागवतचौधरी (राष्ट्रवादी), नीलेश सुरेश चौधरी (शिवसेना), मधुकर बन्सी माळी (भाजप), दीपक गोकुळ जाधव (काँग्रेस), प्रवीण रघुनाथ चौधरी, संभाजी गोविंदा धनगर, तौसिफ सलिम पटेल, गोपाल जगन्नाथ पाटील, महेंद्र सुभाष पाटील, वसंतराव शिवदास भोलाणे, महेंद्र गुलाब महाजन, सुरेखा विजय महाजन, संजय छगन महाजन, उमेश जानकीराम माळी, संजय एकनाथ माळी, मोहम्मद इशाक मोहम्मद यासीन, गुलाबराव रतन वाघ, दीपक आनंदा वाघमारे, हाजी शेख इब्राहीम अब्दुल रसूल यांचे अर्ज दाखल आहेत. आता यापैकी किती व कोणते उमेदवार आपली उमेदवारी मागे घेतील याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
 

Web Title: Last day of withdrawal of election by Dhangaon city chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.