चाकूचा धाक दाखवून विद्यार्थ्याचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 12:50 PM2019-10-17T12:50:31+5:302019-10-17T12:51:02+5:30

पुण्यातून वॉशिंक सेटरवरुन मध्यरात्री केले पलायन

Kidnapping student with knife knife | चाकूचा धाक दाखवून विद्यार्थ्याचे अपहरण

चाकूचा धाक दाखवून विद्यार्थ्याचे अपहरण

Next

जळगाव : घरुन शिकवणीसाठी गेलेल्या उदय ज्ञानेश्वर भोई (१३, रा.म्हसावद, ता.जळगाव) याचे काही जणांनी चाकूचा धाक दाखवून अपहरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी मध्यरात्री पुण्यातील एका वॉशिंग सेंटरवरुन त्याने स्वत:ची सुटका करुन घेत पलायन केले. बुधवारी सायंकाळी हा विद्यार्थी मामासोबत घरी पोहचला.
म्हसावद येथे इंदिरानगरात उदय हा वडील ज्ञानेश्वर भिका भोई, आई मंगला, दोन बहिणी प्रतिभा, अर्चना व लहान भाऊ हितेश या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. तो गावातील शाळेतील नववी इयत्ते शिक्षण घेतो. उदय याने गावात शिकवणी लावली आहे.
त्यासाठी सोमवारी तो नियमितप्रमाणे ८.३० वाजता शिकवणीसाठी गेला. सायंकाळी ७.३० वाजूनही तो घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी शिकवणी असलेल्या शिक्षकाचे घर गाठले. याठिकाणी त्याचे दप्तर मिळून आले. उदय नसल्याने कुटुंबियांची चिंता वाढली.
त्याच्या कुटुंबियांसह गावातील नागरिकांनी, तरुणांनी रात्रभर त्याचा पसिरातील विटनेर, जळके, वावडदा या गावांमध्ये शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही. यांनतर म्हसावद दूरक्षेत्र पोलीस ठाण्यातही कुटुंबिय तक्रारीसाठी गेले मात्र त्यांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रारीचा सल्ला तेथील कर्मचाऱ्यांनी दिला.
गळ्याला चाकू लावून खिशात टाकली पाचशेची नोट
उदयने याने दिलेल्या माहितीनुसार, शिकवणी संपल्यानंतर लघवी करण्यासाठी काही अंतरावर गेला. याठिकाणी आधीच तीन अज्ञात व्यक्ती होते. त्यांनी चाकूचा धाक दाखवून ‘तु हमारे साथ चल’, असे म्हणत एकाने पाचशे रुपये दिले. हमे जलगाव जाना असे सांगितले. यानंतर दुचाकीवरुन जळगावातील रायसोनी महाविद्यालयाजवळ आणले. याठिकाणी एक कार उभी होती, त्या कारसोबतच्या इसमाला दुचाकी दिली, तिघांनी कारमध्ये बसविले. यानंतर कार निघाली. रस्त्यातच आणखी दोन मुलांना गाडी बसविले. ते दोघेही हसतखेळत असल्याने त्याच्या सोबतचे असावेत, असे उदयचे म्हणले आहे. अशा प्रकार उदयसह सातही जण कारने मध्यरात्री २ वाजता पुण्याला एका वॉशिंगसेंटर पोहचले. तेथे उतरताच तिघांनी कार वॉशिंग करण्यास सांगितले. प्रवासात कारमध्ये बसलेले दोघेही कार धुवायला लागले.
भिती वाटायला लागल्याने तिघांचे लक्ष चुकवून पळ काढला. रात्रीच्या सुमारास रस्त्यावरुन पळतांना कुत्रेही भुंकत होते, एका व्यक्तीला कोणते गाव आहे हे विचारले असता, पुणे असल्याचे समजले. यानंतर चौकशी करीत पायी बालेवाडीत मामा शंकर भोई यांचे घर गाठले. तेथे मामाला झाल्याप्रकाराची माहिती दिली. मामांनी म्हसावद येथे कुटुंबियांनाही प्रकार कळवून सुखरुप असल्याने सांगितले. त्याचा फोन आल्यानंतर कुटुंबियांचा जीव भांड्यात पडला.
मुलाला पाहताच आईला अश्रू अनावर
शंकर भोई यांनी उदयला सोबत घेवून महाराष्ट्र एक्स्प्रेसने भुसावळ गाठले. साकेगाव येथील भाऊ विजय भोई यांच्या घरी आले. तेथून दोघे मामांसह उदय बुधवारी रात्री ७वाजेच्या सुमारास म्हसावद पोहचला. तीन दिवसांपासून बेपत्ता पोटच्या गोळ्याला बघताच आई मंगला यांना अश्रू अनावर झाले. उदयचे मामा विजय इंगळे यांना प्रकाराबाबत विचारला असता, त्यांनी उदयने सांगितलेल्या माहितीला दुजोरा दिला आहे. सकाळी एमआयडीसी पोलिसात जावून तक्रार देणार असल्याचे कुटुंबाने सांगितले.

Web Title: Kidnapping student with knife knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव