सर्वच दवाखाने उघडे ठेवा, अन्यथा कारवाई - जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 12:30 PM2020-03-27T12:30:22+5:302020-03-27T12:30:51+5:30

अत्यावस्थ रुग्णांना उपचार मिळण्यास अडचणी येण्याची भीती

Keep all clinics open, otherwise, action - warning of collectors | सर्वच दवाखाने उघडे ठेवा, अन्यथा कारवाई - जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

सर्वच दवाखाने उघडे ठेवा, अन्यथा कारवाई - जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

Next

जळगाव : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवल्यास अत्यावस्थ रुग्णांना उपचार मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यामुळे खाजगी डॉक्टरांनी याची जाणीव ठेवून आपले दवाखाने बंद ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन आहे. याबाबत जिल्हास्तरावर सुरु असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे, अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त वाय.के. बेंडकुळे यांच्यासह सर्व अंमलबजावणी अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे पुढे म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर कारणासाठी नागरीक व खाजगी वाहने रस्त्यावर येणार नाही, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहचण्यास अडथळा होणार नाही, याची काळजी पोलीस विभागाने घ्यावी. लॉकडाऊनच्या काळात जे खाजगी डॉक्टर आपले दवाखाने बंद ठेवून रुग्णांची गैरसोय करतील, त्यांच्याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनला अहवाल पाठविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात कुठेही औषधांचा तुटवडा भासणार नाही याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी. आवश्यकता भासल्यास आरोग्य विभागाने तातडीने औषधांची खरेदी करावी, जीवनाश्यक वस्तूंचा सध्या जरी तुटवडा नसला तरी भविष्यातही होवू नये यासाठी आवश्यक ते नियोजन पुरवठा विभागाने करावे, अशा सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या.
गर्दी टाळण्याासाठी वेगवेगळ््या ठिकाणी भाजीपाला विक्री करा
फळे व भाजीपाला खरेदीसाठी गर्दी टाळण्याासटी विक्रेत्यांनी एकाच ठिकाणी विक्रीस न बसता हातगाडीवर चौकाचौकात व कॉलनीमध्ये जाऊन विक्री करावी, असे आवाहन या वेळी जिल्हाधिकाºयांनी केले. जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणाºया वाहनांना परिवहन विभागाने तर अत्यावश्यक सेवेचे पासेस तहसीलदार यांनी द्याव, आपतकालीन परिस्थती उद्भवल्यास तातडीची उपाययोजना म्हणून जिल्ह्यात किमान ५०० बेड आवश्यक त्या सोयी-सुविधांसह तयार ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागास दिल्या. त्याचबरोबर जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालये लॉकडाऊनच्या काळात बंद राहणार नाही याची सर्व संबधितांनी काळजी घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी यंत्रणेला दिल्यात.

Web Title: Keep all clinics open, otherwise, action - warning of collectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव