गाणी गुणगुणणारा जामनेरचा अय्युबखान झाला आॅर्केस्ट्रातील गायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 08:10 PM2020-01-21T20:10:38+5:302020-01-21T20:14:29+5:30

लहानपणापासून चित्रपटांचे गाणे ऐकून ते गुणगुणणे हा छंद असलेला अय्युबखान बिस्मिल्लाखान हा आज आॅर्केस्ट्रातील गायक झाला आहे.

Jamner's Job Orchestra Becomes a Singer of Songs | गाणी गुणगुणणारा जामनेरचा अय्युबखान झाला आॅर्केस्ट्रातील गायक

गाणी गुणगुणणारा जामनेरचा अय्युबखान झाला आॅर्केस्ट्रातील गायक

googlenewsNext
ठळक मुद्देमोठ्या गीतकारांसोबत मुंबईत गायले गाणेयू ट्यूबवरही गाणे

सय्यद लियाकत
जामनेर, जि.जळगाव : लहानपणापासून चित्रपटांचे गाणे ऐकून ते गुणगुणणे हा छंद असलेला अय्युबखान बिस्मिल्लाखान हा आज आॅर्केस्ट्रातील गायक झाला आहे. अय्युब पहेलवान ही त्यांची ओळख आहे. शेती करण्यासह बाहेर मिळेल ते काम करून संसाराचा गाडा ओढत त्यांनी इथपर्यंत मजल गाठली.
अय्युबखान रेडिओवर, टेपरेकॉर्डरवर गाणे ऐकायचे आणि मनातल्या मनात गुणगुणत राहायचे. चित्रपट पाहण्याचा त्यांना मोठा शौक. जवळच्या मित्रांची मैफल जमली की चित्रपटातील गाणी म्हणायचे. ना कोणी गुरू, ना कोणी मार्गदर्शक. एकदा एकलेले गाणे पाठ झालेच म्हणून समजा.
अय्युब यांनी २००२ मधे काही मित्र मंडळी सोबत मिळून पहिला आॅर्केस्ट्राचा कार्यक्रम जामनेरमध्ये घेतला. त्यानंतर आॅर्केस्ट्रासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी केले व मित्रांसोबत दहा गीतकारांची एक टीम तयार केली. त्यानंतर त्यांनी जळगाव, पुणे, धुळे, मुंबई, मालेगाव, औरंगाबाद आदी ठिकाणी कार्यक्रम घेतले व आपल्या आवाजाची जादू लोकांपर्यंत पोहचवली.
यू ट्यूबवरही गाणे
अय्यूबखान यांनी आपले झालेले कार्यक्रम व गायलेली गाणी यू ट्यूबवर अपलोड केली व ती लोकप्रिय झाली.
गीतकारांसोबत मुंबईत गायले गाणे
अय्युबखान यांनी चित्रपट अभिनेते दिलीपकुमार यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात गायक कविता मूर्ती, जावेद अली, मनीषा जाबोदकर, प्रतिभासिंग आदींसोबत गाण्यांचा सदाबहार कार्यक्रम सादर केला.

Web Title: Jamner's Job Orchestra Becomes a Singer of Songs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.