जामनेरला चाऱ्याअभावी दुग्ध व्यवसाय धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 05:43 PM2019-12-01T17:43:42+5:302019-12-01T17:46:05+5:30

परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे चाºयाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसाय संकटात सापडला आहे.

Jamner risks dairy business due to lack of fodder | जामनेरला चाऱ्याअभावी दुग्ध व्यवसाय धोक्यात

जामनेरला चाऱ्याअभावी दुग्ध व्यवसाय धोक्यात

Next
ठळक मुद्देअति पावसामुळे पिके कुजलीचारा सडलापशुपालक हवालदिल

लियाकत सय्यद
जामनेर, जि.जळगाव : तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे चाºयाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसाय संकटात सापडला असून पशुपालकांची चिंता वाढली आहे.
तालुक्यात काठेवाडी समाजाचे होळ हवेली हे गाव सर्वात जास्त दूध उत्पादन करणारे गाव म्हणून प्रसिद्ध आहे व त्यांचा एकमेव व्यवसाय दुग्ध आहे. गावात जवळपास १५०० गुरे आहेत. आॅक्टोबर महिन्यात सततच्या पावसामुळे येथे भीषण चाराटंचाई निर्माण झाली असून, दुग्ध व्यवसाय संकटात सापडला आहे. परतीच्या पावसामुळे तालुक्यात संपूर्ण चारा सडला आहे. या निकृष्ट चाºयामुळे दुधात प्रचंड घट झाली आहे. यामुळे हा व्यवसाय करणेदेखील परवडत नसल्याचे पशुपालक सांगतात. मका, बाजरी, सोयाबीन आदी पिकापासून गुरांना मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होत होता. यामुळेच येथील शेतकरी हे पीक घेत होते. मात्र यंदा संपूर्ण पीक कुजून गेले असून, उत्पन्न बुडाले आहे. त्यात त्यापासून मिळणारा चाराही सडला आहे. मका, बाजरी सरमट यांची कुट्टी करून यामध्ये भुईमुगाचा पाला मिसळून हा कसदार पुरवठा गुरांना करण्यात येत होता. मात्र यंदा सडका चारा गुरांना खाऊ घालणेदेखील धोक्याचे झाले आहे. कोरडा व हिरवा असा दोन्ही प्रकारचा कसदार चारा असेल तर दुधाचे प्रमाणदेखील वाढते चारा कसा आहे यावरच दुग्ध व्यवसाय अवलंबून असतो. यामुळे निम्म्यावर दूध उत्पादन येऊन ठेपले आहे. याउलट पशुखाद्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. ७० किलो सरकी ढेप पोत्याची किंमत १८०० रुपये, तर ३० रुपये किलो असल्याचे पशुपालकांनी सांगितले. मात्र उदरनिर्वाहासाठी असलेला दुग्ध व्यवसायदेखील चाºयाअभावी अडचणीत असल्यामुळे येथील पशुपालक संकटात सापडला आहेत.
रब्बी हंगामही लांबणार?
खरीप हंगामातील उत्पन्नावरच रब्बी हंगाम अवलंबून असतो. मात्र खरिपाचे गणित बिघडल्याने रब्बी हंगाम लांबणीवर आहे. बºयाच ठिकाणी शेतकरी वर्ग शेतात कापूस पीक उपटून रब्बीची लागवड करण्याच्या तयारीत दिसत आहे. त्यामुळे रब्बीच्या पेरणीला डिसेंबर अखेरपर्यंत वेळ लागू शकतो.
यावलमधून चाºयाची आवक
तालुक्यात परतीच्या पावसामुळे चारादेखील सडका झाला आहे. पशुपालक हे यावल तालुक्यातील यावल, बामणोद, वड्री व या भागातील परिसरातून चारा आणत आहेत.

चाºयाअभावी दुधात प्रचंड घट झाली आहे. याउलट पशुखाद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. ओला दुष्काळ असला तरी जास्त पाण्यामुळे चारा सडला आहे. कोरडा चारा येथे कुठे शिल्लक नाही. नाईलाज गुरांसाठी यावल तालुक्यामधून चारा आणावा लागत आहे.
-बिजल लाखा, दुग्ध व्यवसायिक, होळ हवेली, ता.जामनेर

Web Title: Jamner risks dairy business due to lack of fodder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.