जळगावात महामार्गाने घेतला पुन्हा दुचाकीस्वाराचा बळी, १३ दिवसात दुसरी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 01:05 PM2020-02-22T13:05:41+5:302020-02-22T13:06:13+5:30

खोटे नगरजवळ दुचाकीस्वारला चिरडले

Jalgaon highway again took the victim of a two-wheeler, another incident in 7 days | जळगावात महामार्गाने घेतला पुन्हा दुचाकीस्वाराचा बळी, १३ दिवसात दुसरी घटना

जळगावात महामार्गाने घेतला पुन्हा दुचाकीस्वाराचा बळी, १३ दिवसात दुसरी घटना

Next

जळगाव : खड्डेमय राष्टÑीय महामार्ग व खराब साईडपट्टयाने शुक्रवारी पुन्हा शहरात एका दुचाकीस्वाराचा बळी घेतला. कंपनीतून घरी जात असलेल्या अनिल वसंत पाटील (५७, रा.नारायण नगर, बिबा नगर, जळगाव, मूळ रा.चितोडा, ता. यावल) या दुचाकीस्वाराला मागून आलेल्या डंपरने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता खोटे नगराजवळ झाला.
दरम्यान, याच ठिकाणापासून काही अंतरावर ८ फेबु्रवारी रोजी सायंकाळी गायत्री समाधान पाटील (२७, रा़पिंप्राळा) या महिलेलाही अज्ञात वाहनाने उडविले होते. त्यात त्यांचीही मृत्यू झाला होता. १३ दिवसात त्याच ठिकाणावर हा दुसरा बळी आहे.
अनिल पाटील हे एमआयडीसीत कंपनीत कामाला होते. शुक्रवारी सायंकाळी ड्युटी संपल्यानंतर दुचाकीने (क्र.एम.एच.१९ ए. एन. २६९७) घरी जात असताना खोटे नगरानजीक उताराजवळ मागून येणाऱ्या डंपरचा (क्र.एम.एच.१९ झेड. ५७५६) दुचाकीला कट लागला, त्यात खराब साईडपट्टीमुळे पाटील यांची दुचाकी रस्त्याच्याकडेला खड्डयात तर पाटील रस्त्यावर पडले. त्यामुळे डंपरचे चाक त्यांच्या डोक्यावरुन गेले. अपघातानंतर डंपर चालक फरार झाला. शहर वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक दिलीप पाटील, योगेश पाटील तसेच उमेश भांडारकर व सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली
गल्लीतील तरुणांनी ओळखला मृतदेह
या अपघातानंतर मृतदेह जागेवर पडून असल्याने ओळख पटत नव्हती. त्याचवेळी बिबा नगरातील योगेश बाविस्कर हा तरुण अपघाताच्या ठिकाणी आला. त्याने पाटील यांचा मृतदेह ओळखला आणि मित्र तसेच शेजारीच राहणारा गौतम गवई या तरुणाला फोन करुन पाटील यांच्या अपघाताची माहिती दिली. त्यानंतर पाटील यांचा मुलगा अजय व पत्नी ज्योती यांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेतून पाटील यांना जिल्हा रुग्णालयात आणले असता तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.
पत्नी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका
अनिल पाटील हे १५ वर्षापासून ते शहरातच वास्तव्याला होते. पत्नी ज्योती या शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका आहेत. मुलगा अजय व मुलगी जयश्री दोन्ही एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत.

Web Title: Jalgaon highway again took the victim of a two-wheeler, another incident in 7 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव