In Jalgaon district, 5 candidates have less votes than nota | जळगाव जिल्ह्यात ५४ उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मते
जळगाव जिल्ह्यात ५४ उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मते

जळगाव : निवडणूक लढवित असलेल्या उमेदवारांपैकी कुणीही उमेदवार पसंत नसल्यास ‘या पैकी कुणीही नाही’ (नन आॅफ अबोव्ह-नोटा) या पर्यायाचा वापर करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने मतदारांना उपलब्ध करून दिली आहे. यंदा मात्र ‘नोटा’चा वापर मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले. जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील तब्बल २५ हजार ५८८ मतदारांनी ‘नोटा’चे बटन दाबले असल्याचे मतमोजणीत उघड झाले आहे. तर या मतदारसंघांमधील तब्बल ५४ उमेदवारांना ‘नोटा’च्या मतांपेक्षाही कमी मते मिळाली आहेत.

चोपडा विधानसभा
नोटा- २१७५
कमी मते मिळालेले उमेदवार-२
१) ईश्वरलाल सुरेश कोळी-अपक्ष-
मते-१५२९
२) दगडू फत्तू तडवी-अपक्ष-मते- ७६८रावेर विधानसभा
नोटा-१९४६
कमी मते मिळालेले उमेदवार- ४
१) संतोष मधुकर धिवरे- बसपा-
मते-११०४
२) राजाराम माधव सोनार-अपक्ष-
मते-४९३
३) डी.डी.वाणी(फोटोग्राफर)-
अपक्ष- मते-१३३३
४) संजय हमीद तडवी-अपक्ष-
मते-४६१


भुसावळ विधानसभा
नोटा-३२७७
कमी मते मिळालेले उमेदवार-८
१) निलेश अमृत सुरळकर-मनसे-
मते-२०९५
२) राकेश साहेबराव वाकाडे-
बसपा-मते-९७०
३) अजय जिवराम इंगळे-बहुजन
मुक्ती पार्टी-मते-८०६
४) कैलास गोपाल घुले-
आययुएमएल-मते-८८२
५) गीता प्रशांत खाचणे-अपक्ष-
मते-२१५७
६) निलेश राजू देवघाटोळे-अपक्ष-
मते-५०१
७) यमुना दगडू रोटे-अपक्ष-
मते-९१७
८) सतीश भिका घुले-अपक्ष-
मते-१५७२


जळगाव शहर
नोटा-४९९८
कमी मते मिळालेले उमेदवार-मते-१०
१) अशोक श्रीधर शिंपी-बसपा-मते-१२१४
२) अ‍ॅड.जमील देशपांडे-मनसे-मते-३४८१
३) वंदना प्रभाकर पाटील-महाराष्टÑ क्रांती सेना-मते-९०९
४) सुरवाडे गौरव दामोदर-बहुजन मुक्ती पार्टी-मते-२०३
५) अनिल पितांबर वाघ-अपक्ष-मते-४२०
६) प्रा.डॉ.आशिष जाधव-अपक्ष-मते-३९०
७) गोकुळ रमेश चव्हाण-अपक्ष-मते-३६४
८) माया बुधा अहिरे-अपक्ष-मते-३७४
९) ललित गौरीशंकर शर्मा-अपक्ष-मते-५०१
१०) शिवराम मगर पाटील-अपक्ष-मते-११६९


जळगाव ग्रामीण विधानसभा
नोटा-२३८२
कमी मते मिळालेले उमेदवार-६
१) संजय पन्नालाल बाविस्कर-बसपा-मते-९०५
२) दिलीप राजाराम पाटील-पीएडब्लूपीआय-मते-६२९
३) प्रदीप भिमराव मोतीराया-अपक्ष-मते-१३६२
४) लक्ष्मण गंगाराम पाटील-अपक्ष-मते-३५७
५) सोनवणे ईश्वर उत्तम-अपक्ष-मते-३११
६) संभाजी कडू कोळी-अपक्ष-मते-११२९


पाचोरा विधानसभा
नोटा-१७२४
कमी मते मिळालेले उमेदवार-३
१) संतोष फकीरा मोरे-बसपा-मते-६६९
२) मांगो पुंडलिक पगारे-बमपा-मते-५८८
३) राजेंद्र सुरेश चौधरी-अपक्ष-मते-९४७


एरंडोल विधानसभा
नोटा-१९९५
कमी मते मिळालेले उमेदवार-४
१)संजय लक्ष्मण लोखंडे-बसपा-मते-६३५
२)आबासाहेब चिमणराव पाटील-अपक्ष-मते-२५८
३)प्रा.प्रतापराव रामदास पवार-अपक्ष-मते-५०६
४)राहुल रघुनाथ पाटील-अपक्ष-७९३


जामनेर विधानसभा
नोटा-२१०५
कमी मते मिळालेले उमेदवार-५
१) डॉ.विजयानंद कुलकर्णी-मनसे-मते-१४३९
२) शक्तीवर्धन शांताराम सुरवाडे-बसपा-मते-६७३
३) गजानन रामकृष्ण माळी-अपक्ष-मते-६५९
४) पवन पांडुरंग बांडे-अपक्ष-मते-५१४
५) वसंत रामू इंगळे-अपक्ष-मते-३७२


मुक्ताईनगर विधानसभा
नोटा-१८०६
कमी मते मिळालेले उमेदवार-४
१) भगवान दामू इंगळे-बसपा-मते-१५८३
२) संजू कडू इंगळे-बमुपा-मते-१४०३
३) ज्योती महेंद्र पाटील-अपक्ष-मते-८८८
४) संजय प्रल्हाद कांडेलकर-अपक्ष-मते-५६०


अमळनेर विधानसभा
नोटा-१५०३
कमी मते मिळालेले उमेदवार-४
१) अंकलेश मच्छिंद्र पाटील-मनसे-मते-५२८
२) रामकृष्ण विजय बनसोडे-बसपा-मते-४९८
३) अनिल (दाजी) भाईदास पाटील-अपक्ष-मते-१०६१
४) संदीप युवराज पाटील-अपक्ष-मते-४८७


चाळीसगाव विधानसभा
नोटा-१६७७
कमी मते मिळालेले उमेदवार-४
१) ओंकार पितांबर केदार-बसपा-मते-१३०१
२) राकेश लालचंद जाधव-मनसे-मते-१३९९
३) उमेश प्रकाश कर्पे-अपक्ष-मते-७८२
४) विनोद महादेव सोनवणे-अपक्ष-मते-१००५धुळे जिल्ह्यात १३४१० जणांची ‘नोटा‘ला पसंती
धुळे- विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत़ निवडणूक आयोगाने मतदाराना नकारात्मक मतदानाचा पर्याय दिलेला असतो़ धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात १३ हजार ४१० मतदारांनी नोटाला पसंती दिल्याचे चित्र समोर आले आहे़ ईव्हीएम मध्ये सर्वात खाली नोटा बटणाचा पर्याय दिलेला असतो़ जर यादी मधे दिलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार मतदाराला पसंत नसेल तर, अशा वेळी नोटा हा पर्याय निवडणूक आयोगाने दिलेला आहे़ या पर्यायाचा वापर शहरी भागातील मतदार अधिक करतात, असा अंदाज असताना साक्री मतदार संघातील ग्रामीण भागातील मतदारांनी सर्वाधिक नोटाला पसंती दिली़ विधानसभा निवडणूकीत साक्री मतदारसंघात सर्वाधीक ४ हजार १४७ मतदारांनी नोटाला पसंती दिली़ दुसऱ्या क्रमांकावर शिरपूर मतदारसंघ ३ हजार ८२८ मतदारांनी नोटाचे बटन दाबले़ तर शिंदखेडा मतदार संघात १ हजार ८१६ मतदारांनी नोटाचा वापर केला़ धुळे शहर मतदारसंघात, १ हजार ३७१ मतदारांनी नोटा पर्यायाचा वापर केला़

नंदुरबार जिल्ह्यातील ११ उमेदवारांना ‘नोटा’पेक्षा कमी मते
नंदुरबार जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात यावर्षी एकूण २६ उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. त्यापैकी ११ उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मते मिळाली आहेत. २०१४ च्या तुलनेत ही संख्या यावर्षी निम्म्यावर आहे. जिल्ह्यातील नवापूर विधानसभा मतदारसंघात यावर्षी सर्वाधिक म्हणजे १० उमेदवार होते. या मतदारसंघात ‘नोटा’ला चार हजार ९४९ मते पडली आहेत. या मतांपेक्षाही पाच उमेदवारांना कमी मते आहेत. त्यात आम आदमी पक्षासह चार अपक्षांचा समावेश आहे. आम आदमी पक्षाचे डॉ.सुनील गावीत यांना ४७५, अपक्ष रामू वळवी यांना ७३५, अर्जुनसिंग वसावे एक हजार ३८, प्रकाश गांगुर्डे यांना एक हजार १४१ तर डॉ.राकेश गावीत यांना एक हजार २८६ मते मिळाली आहेत. नंदुरबार मतदारसंघात एकूण सहा उमेदवार होते. त्यात नोटाला तीन हजार ४९७ मते पडली आहेत. तर त्यापेक्षा कमी मते बीएसपीचे विपुल वसावे यांना एक हजार ९२१, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रकाश गांगुर्डे एक हजार ४३७ तर अपक्ष आनंद कोळी यांना दोन हजार ४० मते मिळाली आहेत. अक्कलकुवा मतदारसंघात एकूण सहा उमेदवार होते. येथे नोटाला चार हजार ८५६ मते पडली. तर आम आदमी पक्षाचे अ‍ॅड.कैलास वसावे यांना चार हजार ३४, अपक्ष डॉ.संजय वळवी यांना दोन हजार ८०८ व अपक्ष भरत पावरा यांना तीन हजार ७८२ मते मिळाली. शहादा मतदारसंघात एकूण चार उमेदवार होते. येथे नोटाला तीन हजार ४४३ मते पडली.

Web Title: In Jalgaon district, 5 candidates have less votes than nota

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.