जळगाव : गुलाबराव पाटलांच्या कव्वाली गायनावर वादग्रस्त ट्वीट; निलेश राणेंवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 05:10 PM2021-11-07T17:10:02+5:302021-11-07T17:10:26+5:30

Nilesh Rane, Gulabrao Patil : दोन दिवसांपूर्वी जळगावातील नशिराबाद येथे झालेल्या कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी कव्वाली गायन केलं होतं.

Jalgaon Controversial tweet on Gulabrao Patils Qawwali singing Filed a case against bjp leader Nilesh Rane | जळगाव : गुलाबराव पाटलांच्या कव्वाली गायनावर वादग्रस्त ट्वीट; निलेश राणेंवर गुन्हा दाखल

जळगाव : गुलाबराव पाटलांच्या कव्वाली गायनावर वादग्रस्त ट्वीट; निलेश राणेंवर गुन्हा दाखल

googlenewsNext

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्याबाबत सोशल मीडियावर (Social Media) बदनामीकारक पोस्ट टाकल्याप्रकरणी भाजपाचे नेते नीलेश राणे यांच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी जळगावातील नशिराबाद येथे झालेल्या कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी कव्वाली गायन केलं होतं. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी ट्वीट करत त्यांना लक्ष्य केलं होतं. दरम्यान, यानंतर शिवसैनिक त्यांच्याविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

शिवसेनेचे तालुकाप्रमुख छोटू बाबुराव भोई यांनी मुक्ताईनगर पोलिसात निलेश राणे यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे. माजी खासदार निलेश राणे यांनी मंत्री पाटील यांच्याविरुद्ध ट्विटर हँडलवर बदनामीकारक पोस्ट टाकली आहे. तसेच शिवीगाळही केलेली आहे, अशी फिर्याद त्यांनी दिली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरिक्षक राहुल खताळ करत आहेत.


दोन दिवसापूर्वी नशिराबाद  येथे झालेल्या एका कार्यक्रमात पाटील यांनी कव्वाली गायन केले होते. त्यावर राणे यांनी ट्विटरवर टीका केली होती. शिवसेनेची वाटचाल काँग्रेस आणि एमआयएमच्या दिशेने सुरू असल्याची टीकाही राणे यांनी आपल्या ट्वीटमध्ये केली होती.

Web Title: Jalgaon Controversial tweet on Gulabrao Patils Qawwali singing Filed a case against bjp leader Nilesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.