जळगाव शहर मतदार संघ : १३ उमेदवारांचा २५ लाख ७७ हजार ६२९ रुपये खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 12:59 PM2019-10-19T12:59:46+5:302019-10-19T13:00:30+5:30

अंतिम तपासणी ११ नोव्हेंबर रोजी

Jalgaon City Constituency: Expenditure of Rs | जळगाव शहर मतदार संघ : १३ उमेदवारांचा २५ लाख ७७ हजार ६२९ रुपये खर्च

जळगाव शहर मतदार संघ : १३ उमेदवारांचा २५ लाख ७७ हजार ६२९ रुपये खर्च

googlenewsNext

जळगाव : विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या खर्चाची तिसरी हिशोब तपासणी १८ रोजी करण्यात आले. यामध्ये निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण १३ उमेदवारांचा २५ लाख ७७ हजार ६२९ रुपये खर्र्च झाला आहे. आता उमेदवारांच्या खर्चाची अंतिम तपासणी मतदानानंतर ११ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार असून त्या विषयी उमेदवारांना पत्र देण्यात आले आहे.
जळगाव शहर मतदार संघात निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या हिशोब वहीची तिसरी तपासणी १८ रोजी करण्यात आली.
यात उमेदवारांनी सादर केलेल्या हिशोबानुसार भाजपचे उमेदवार सुरेश भोळे यांचा १३ लाख ८० हजार ४६० रुपये खर्च झाला आहे. त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अभिषेक पाटील यांचा ६ लाख ८९ हजार ७३० रुपये, वंचित बहुजन आघाडीचे शफी अ.नबी शेख एक लाख २२ हजार ३२ रुपये, अपक्ष उमेदवार शिवराम पाटील यांचा ७८ हजार ९४७ रुपये, अपक्ष उमेदवार अनिल वाघ यांचा ६९ हजार ७४३ रुपये, मनसेचे जमील देशपांडे यांचा ४७ हजार ७७७ रुपये, अपक्ष डॉ. आशीष जाधव यांचा ४६ हजार २१६ रुपये, महाराष्ट्र क्रांती सेनेच्या वंदना पाटील यांचा ३६ हजार ७०५ रुपये, अपक्ष माया अहिरे यांचा २९ हजार ७२६ रुपये, बहुजन समाज पक्षाचे अशोक शिंपी यांचा २८ हजार ९०७ रुपये, अपक्ष गोकूळ चव्हाण यांचा २४ हजार ९५० रुपये, अपक्ष ललित शर्मा यांचा १३ हजार ३६६ रुपये, बहुजन मुक्ती पक्षाचे गौरव सुरवाडे ९ हजार ७० रुपये असा एकूण १३ उमेदवारांचा २५ लाख ७७ हजार ६२९ रुपये खर्च झाल्याची माहिती निवडणूक खर्च हिशोब शाखेतून मिळाली.
अंतिम तपासणी ११ नोव्हेंबर रोजी
विधानसभा निवडणूक लढविणाºया उमेदवारांच्या खर्चाची अंतिम तपासणी मतदानानंतर ११ नोव्हेंबर रोजी १० वाजता करण्यात येणार आहे. या साठी निवडणूक खर्चाची हिशोब नोंदवही सादर करण्यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारांना पत्र दिले आहे.
यामध्ये उमेदवारांना त्यांचे अद्यायावत केलेले बँक पासबुक, हिशोबाकरीता दर्शविण्यात आलेले देयके, मूळ कागदपत्र, खर्च वाहन परवाना या सोबतच दैनंदिन खर्च पडताळणी वरील ठरवून दिलेल्या दिवशी सादर करावे लागणार आहे.
उमेदवारांनी माहिती सादर केल्यानंतर त्यांची लेखा पडताळणी होऊन आवश्यक लेखांकन विवरण पत्र निवडणूक निरीक्षकांच्या स्वाक्षरीनंतर निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याच्याही सूचना पत्रात दिल्या आहेत. उमेदवारांनी अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी ठरवून दिलेल्या दिवशी आपल्या हिशोब नोंदवहीसह हजर रहावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी दीपमाला चौरे यांनी केले आहे.

Web Title: Jalgaon City Constituency: Expenditure of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव