जळगाव: १० नगरसेवक आणणाऱ्यास महापौरपदाची उमेदवारी, सत्ता राखण्यासाठी भाजपची अट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 08:16 AM2021-03-18T08:16:01+5:302021-03-18T08:16:09+5:30

सोमवारी १० नगरसेवक आपल्या बाजूने आणेल, त्याचे नाव महापौर व उपमहापौरपदासाठी अंतिम असेल, अशी अट माजी मंत्री गिरीश महाजन यांनी घालून दिली आहे. एकंदरीतच भाजपची वाट बिकट मानली जात आहे.

Jalgaon: Candidate for the post of mayor for bringing 10 councilors BJP's condition for maintaining power | जळगाव: १० नगरसेवक आणणाऱ्यास महापौरपदाची उमेदवारी, सत्ता राखण्यासाठी भाजपची अट

जळगाव: १० नगरसेवक आणणाऱ्यास महापौरपदाची उमेदवारी, सत्ता राखण्यासाठी भाजपची अट

googlenewsNext

जळगाव: महापालिकेतील २७ नगरसेवक फुटल्याने अल्पमतात आलेल्या भाजपकडे ३० नगरसेवक असून, त्यातील काही नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे बहुमताचा ३८ हा आकडा गाठण्यासाठी भाजपला ८ नगरसेवक हवे आहेत. खबरदारी म्हणून १० नगरसेवक आणणाऱ्या उमेदवाराचे नाव महापौरपदासाठी निश्चित केले जाणार असल्याचे समजते. गुरुवारी निवडणूक होणार आहे.

सोमवारी १० नगरसेवक आपल्या बाजूने आणेल, त्याचे नाव महापौर व उपमहापौरपदासाठी अंतिम असेल, अशी अट माजी मंत्री गिरीश महाजन यांनी घालून दिली आहे. एकंदरीतच भाजपची वाट बिकट मानली जात आहे. बुधवारी सकाळी शिवसेनेकडून जयश्री महाजन व कुुलभूषण पाटील यांचे अर्ज दाखल झाल्यानंतर दुपारी भाजपकडून महापौरपदासाठी भारती सोनवणे व प्रतिभा कापसे यांचे, तर उपमहापौरपदासाठी मयुर कापसे व सुरेश सोनवणे यांनी अर्ज केले. गिरीश महाजन यांनी ही चार नावे दिली. सोमवारी भाजपच्या ९ नगरसेवकांनी मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला होता. 

नगरसेविका गायब, पतीची पोलिसात तक्रार
भाजपच्या नगरसेविका ज्योती चव्हाण गायब झाल्याची तक्रार त्यांचे पती बाळासाहेब चव्हाण यांनी दिली आहे. भाजप नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांच्यासोबत नाशिकला जात असल्याचे ज्योती चव्हाण यांनी सांगितले होते. मात्र नाशिकला गेल्यानंतर त्यांचा संपर्क झालेला नसल्याचे बाळासाहेब चव्हाण यांनी सांगितले. पत्नीचा शोध घेऊनही ती न मिळाल्याने चव्हाण यांनी बुधवारी पोलिसांत तक्रार दिली. 

निवडणूक ‘ऑनलाइन’ 
औरंगाबाद : जळगाव महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक ऑनलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना औरंगाबाद खंडपीठाने निवडणूक प्रक्रियेला कुठलीही स्थगिती दिली नाही. परिणामी गुरुवारी होणारी महापौर व उपमहापौरांची निवडणूक ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहे. या निवडणुकीत सभागृहात प्रत्यक्ष मतदान घेण्याची मागणी केली होती. 
 

Web Title: Jalgaon: Candidate for the post of mayor for bringing 10 councilors BJP's condition for maintaining power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.