खगोलशास्त्र व भौतिकशास्त्रात जगाला दखल घ्यायला लावणारे - मेघनाद सहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 12:03 AM2019-12-10T00:03:50+5:302019-12-10T00:04:11+5:30

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत बारा बलुतेदार या सदरात लिहिताहेत खंडपीठातील वकील माधव भोकरीकर...

Intriguing to the world in astronomy and physics - Meghnad VI | खगोलशास्त्र व भौतिकशास्त्रात जगाला दखल घ्यायला लावणारे - मेघनाद सहा

खगोलशास्त्र व भौतिकशास्त्रात जगाला दखल घ्यायला लावणारे - मेघनाद सहा

Next

आपण 'तेली' शब्दाच्या व्युत्पत्तीकडे पाहिले, तर हा शब्द 'तैल' या संस्कृत शब्दापासून बनला आहे. तेला संबंधाने व्यवसाय करणारा, 'तेली' ही साधी उत्पत्ती आपणास समजू शकते. मात्र आपण पौराणिक आधार घेतला, तर याच्या काही मनोरंजक गोष्टी समजतात. शंकराने आपल्या शरीरापासून निर्मिती करून, त्यांना आपल्या शरीराचे मर्दन तेलाने करण्यास सांगितले. यासाठी एक बैल मदतीला दिला. तेल कसे गाळावे हे सांगितले. त्यामुळे या समाजाचा मुख्य व्यवसाय तेलबियांपासून तेल गाळणे आहे.
कालौघात सर्व व्यवसायांचे यांत्रिकीकरण झाल्याने तशी मक्तेदारी आता कोणत्याचीही व्यवसायात राहीलेली नाही. त्यामुळे पशुपालन, शेती, शेळीपालन, यातून निर्माण होणारे विविध व्यवसायात, तसेच विविध प्रकारच्या नोकऱ्यांमध्येदेखील त्यांनी बस्तान बसविले आहे. उत्तर भारतात दुग्ध व्यवसाय, राजस्थानात तेल व्यवसाय, हॉटेल व्यवसाय तर पंजाबमध्ये कात्री बनविण्याच्या उद्योगात ठळकपणे दिसतात. यातील काही त्यांच्या सांपत्तिक स्थितीमुळे सावकार म्हणून ओळखले जातात. राजकारणातदेखील चांगले बस्तान बसविले आहे. या समाजात त्यांच्या उद्योगप्रियतेमुळे, शिक्षणाकडे असलेल्या लक्षामुळे दारिद्र्य आढळत नाही.
हिंदू धर्मातील घटक असलेला समाज, त्या संस्कृतीप्रमाणे आपले आचरण करतो. त्या राज्यातील असलेली भाषा हे बोलतात. उत्तर भारतात 'मलिक', मध्य प्रदेशात 'साहू' म्हणून ओळखले जातात. मुलांना, मुलींना पण शिक्षणाच्या बाबतीत यांच्यात फारसा भेदभाव आढळत नाही. मुलींना तुलनेने सारखीच वागणूक मिळते, जरी तिचे स्थान कुटुंबात दुय्यम असले तरी! हिमाचल प्रदेशातील यांच्या समाजातील महिला या 'चंबा' नावाने ओळखल्या जाणाºया भरत कामात कुशल असतात.
'तेली पंचायत' म्हणून असलेली व्यवस्था समाजातील बरेचसे कौटुंबिक वादविवाद, समाजहित लक्षात घेऊन सोडवितात. मुलाच्या जन्माच्या वेळी, लग्नाच्या वेळी देवदेवतांची पूजा-प्रार्थना करण्याची पद्धत आहे. 'मनसा देवी' म्हणजे आपल्या मनोआकांक्षा पूर्ण करणारी देवी दैवत असते. अंत्यसंस्कार झाल्यानंतरची रक्षा गंगेत सोडून देण्याची याची रूढी आहे. अकराव्या शतकातील बांधलेले 'तेली का मंदिर' हे ग्वालियर येथील भगवान विष्णूचे मंदिर, उत्तर आणि दक्षिण कला स्थापत्याचा सुंदर आविष्कार आहे. या 'तेली' समाजातील व्यक्तींनी, आपल्या समाजाच्या उत्थानात आपला मोलाचा वाट उचलला आहे. या समाजातील काही, प्रसिद्ध व्यक्ती बघितल्या तर समजू शकेल. संताजी जगनाडे महाराज- हे तेली समाजातील संत. इ.स. १६२४ ते इ.स. १६८८ दरम्यान महाराष्ट्रातील देहू गावाजवळच्या सुदुंबरे गावी होऊन गेले. संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांचे लेखन यांनी केले. हे 'सन्तु तेली' या नावाने परिचित होते. संत तुकारामांच्या सहवासात राहून त्यांनी तुकाराम महाराजांचे अभंग लिहीण्यास सुरुवात केली.
'अभंग गाथा' इंद्रायणीत बुडवल्यानंतर, ती संताजी महाराजांना मुखोद्गत असल्याने, त्यांनी पुन्हा लिहिली. संत तुकारामांनी संताजींना शेवटच्या क्षणी माती टाकण्यास येणार असे वचनही दिले होते. मात्र ते संत संताजी महाराजांच्या पूर्वीच वैकुंठाला गेले. संताजींच्या अंतकाळी कितीही प्रयत्न केले, तरी त्यांचे पूर्ण शरीर गाडले जात नव्हते. चेहरा झाकला जात नव्हता, तेव्हा वैकुंठाहून तुकाराम महाराज वचन पूर्ण करण्यासाठी आले. त्यांनी माती टाकल्यानंतर संताजींचा पूर्ण देह झाकला गेला. त्यांचा हा अभंग-
नको ते जोखड म्हणे गोरा कुंभार।
रोहिदास चांभार तेचि म्हणे ।।
नरहरी सोनार चोखा मेळा म्हणे।
आमुचिही मने बिघडविली।।
संतु तेली म्हणे घाण्याचे जोखड।
आहे फार जड जगामाजी।।
भारतीय खगोलशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ म्हणून विख्यात असलेले, आणि 'नोबेल पुरस्कारासाठी' एकापेक्षा जास्तवेळा नामांकन मिळालेले आणि भारतातील नद्यांचे नियोजनाचे शिल्पकार, ज्यांनी 'बंगालचे अश्रू' समजल्या जाणाºया 'दामोदर नदीच्या' नेहमी येणाºया पुराच्या संकटाचे काय नियोजन करता येईल.
याचा आराखडा बनविला, ते कै.मेघनाद साहा, याच समाजाची देणगी! भारताचे खंबीर, करारी नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी, हे याच समाजाचे!
भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करणारा क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद याच समाजातील! युरोपमध्ये सन १९४८ साली प्रथम भारतीय उद्योगधंदा सरू करणारे पांडुरंग बनारसे, सन १९६५ मध्ये इंग्लंडमध्ये हिंदूधर्मीयांचे पहिले मंदिर बांधणारे याच समाजातील! (उत्तरार्ध)
-अ‍ॅड.माधव भोकरीकर, जळगाव

Web Title: Intriguing to the world in astronomy and physics - Meghnad VI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.