साईडपट्टीवरुन दुचाकी चढविण्याच्या प्रयत्नात तोल जावून पडलेल्या तरुणाला ट्रकने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 01:01 PM2019-10-19T13:01:55+5:302019-10-19T13:02:26+5:30

जळगाव नजीक बांभोरीजवळ अपघात

Injured in a truck collided with a truck while trying to drive a bike off the sidewalk. | साईडपट्टीवरुन दुचाकी चढविण्याच्या प्रयत्नात तोल जावून पडलेल्या तरुणाला ट्रकने चिरडले

साईडपट्टीवरुन दुचाकी चढविण्याच्या प्रयत्नात तोल जावून पडलेल्या तरुणाला ट्रकने चिरडले

Next

जळगाव : दुचाकीत पेट्रोल भरुन घराकडे परततांना साईटपट्टीवरुन दुचाकी महामार्गावर चढविण्याच्या प्रयत्नात तोल जावून महार्गावर पडल्याने मागून आलेल्या ट्रकने धर्मेंद्र मिथलेश बरहार (१६,मूळ रा. उथरगाव, उत्तरप्रदेश) या तरुणाला ट्रकने चिरडल्याची घटना शनिवारी सकाळी ९ वाजता बांभोरी महाविद्यालयाजवळ घडली. अपघातानंतर ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद हा शनिवारी सकाळी दुचाकीत (क्र. एम.एच.१९.बी.वाय.८५२१) पेट्रोल भरण्यासाठी घराबाहेर पडला. बांभोरी गावापासून काही अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपावर त्याने दुचाकीत पेट्रोल भरले. यानंतर पुन्हा बांभोरीकडे निघाला. यावेळी खोल साईडपट्टीवरुन दुचाकी महामार्गावर चढविण्याच्या प्रयत्नात तो तोल जावून महामार्गावर पडला. यावेळी पाळधीकडे जाणाऱ्या ट्रकने ( क्र.डब्लू.बी. १७,४३३५) त्याला चिरडले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
पोलीस कर्मचाºयाने घेतली धाव
हा अपघात झाला तेव्हा विधानसभा निवडणुकीसाठी स्थीर सर्व्हेक्षण पथक विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराची पाहणी करीत होते. या पथकातील पोलीस कर्मचारी नारसिंग पाडवी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. बांभोरी येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर धर्मेंद्रची ओळख पटली. जैन इरिगेशनच्या रुगणवाहिकेने मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी तालुका पोलीसांनी ट्रकसह ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे.अपघातानंतर काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. महामार्ग वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
दोन महिन्यांपूर्वीच आला बांभोरीत मेव्हण्याकडे
मूळ उत्तरप्रदेश राज्यातील उथरगाव जि. जालोन येथे धर्मेंद्र आई, वडील व भाऊ या परिवारासह वास्तव्यास होतो. दोन ते महिन्यांपूर्वी तो कामानिमित्ताने त्याचे बांभोरी येथील मेव्हणे सुनील परमलाल बरहार व बहिण पूमन सुनील बरहार यांच्याकडे आला होता. बांभारो येथील बसस्टॉपवर रोज तो पाणी पुरीची गाडी लावून उदरनिर्वाह करत होतो.
 

Web Title: Injured in a truck collided with a truck while trying to drive a bike off the sidewalk.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव