बाजारातील समस्या सोडविण्याचे प्रयत्न केल्यास उद्योग उभे राहतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 07:40 PM2019-10-19T19:40:58+5:302019-10-19T19:42:09+5:30

आंत्रप्रिन्योअर्स डे : युवा उद्योजक आकाश कांकरिया यांचे प्रतिपादन

 Industries will stand if they try to solve market problems | बाजारातील समस्या सोडविण्याचे प्रयत्न केल्यास उद्योग उभे राहतील

बाजारातील समस्या सोडविण्याचे प्रयत्न केल्यास उद्योग उभे राहतील

Next

जळगाव- डोक्यात आलेल्या कल्पना प्रत्यक्षात कामात उतरविण्याचा प्रयत्न करावा, सोबतच बाजारातील समस्या ओळखून त्या सोडविण्यासाठी तुम्ही प्रयत्न केल्यास त्यातून उद्योग उभा राहू शकतो, असे प्रतिपादन युवा उद्योजक आकाश कांकरिया यांनी केले.
शिक्षणासोबतच उद्योजकतेच गुण विद्यार्थ्यांमध्ये रूजविण्यासाठी आयएमआर महाविद्यालयात शनिवारी आंत्रप्रिन्योअर्स डे साजरा करण्यात आला़ या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून सीए विक्की बिर्ला, सागर पटनी, प्रा़ डॉ़ शिल्पा बेंडाळे आदींची उपस्थिती होती़ प्रा. डॉ़ शिल्पा बेंडाळे यांनी सर्वप्रथम प्रास्ताविक करून विध्यार्थ्यांना आंत्रप्रिन्योअर्स डे साजरा करण्या मागचा हेतू स्पष्ट केला. व चांगल्या कल्पना असतील तर प्रत्येक अडचणींवर मात करता येते आणि यश संपादन करता येते असे त्यांनी सांगितले़ सूत्रसंचालन प्रा़ धनश्री चौधरी यांनी केले तर आभार प्रा़ अनिलकुमार मार्थी यांनी केले.

कलाविष्कारांचे सादरीकरण
दुपार सत्रात आंत्रप्रिन्योअर्स डे मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पनांना प्रत्यक्षात साकार करून त्या प्रदर्शनात मांडल्या होत्या़ त्यात व्यवसायाचे मॉड्युलसचेही सादरीकरण केले़ त्यात केळीच्या पानांपासून बनविण्यात आलेल्या बॅनलेनॅचुरलस, इव्हेंट मॅनेजमेंट, मोमोज लॅण्ड, ग्लोवे कंपनी, फेमस बाजार, पेपर बॅगस्, कॉटन कॅरीबॅग, फ्रेष फार्म, गार्डनिंग सिस्टम, हेल्पींग हॅण्डस्, आॅटो अलर्ट अ‍ॅक्सिडेंट डिव्हाईस, जॉब अलर्ट, मोबाईल गॅरेज, या सारख्या अफलातून कल्पनांचा आविष्कार विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केला होता. तर उत्पादन प्रदर्षन आणि विक्रीच्या माध्यमातूनही विदयार्थ्यांनी प्रत्यक्ष उदयोगाचा अनुभव घेतला. त्यात चना कचोरी, फाईव फलेवर पानी पुरी, मावा कुल्फी, ब्युटी प्रॉडक्टस् दिवाली प्रॉडक्टस, सॅण्डविच हया सारख्या उत्पादनांची विक्री करून नफा कमविण्याची कला साध्य केली.

यांनी मारली बाजी
बी प्लॅन स्पर्धेत प्रथम क्रमांक अंकिता वर्मा, प्रज्वल मणियार, निषांत मांडे आणि अमातुल्ला अली असगर, तर द्वितीय-मयुरेष तळेले, रिया थरानी, प्रियांका जाधव, निहार सय्यद, तृतीय क्रमांक विषाल वाधवानी यांनी पटकाविला़ तर प्रॉडक्ट डिस्पले आणि सेल्स या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रतिक्षा कुलकर्णी, भक्ती कुलकर्णी यांनी तर द्वितीय शिवानी भावसार आणि सलोनी पाटील, आणि तृतीय क्रमांक वैष्णवी अत्तरदे, सृष्टी दांडेकर, टिना टेंभानी यांनी पटकाविला.

 

Web Title:  Industries will stand if they try to solve market problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.