कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, मुलांची शोध मोहीम थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 09:11 PM2021-03-02T21:11:05+5:302021-03-02T21:11:05+5:30

निवेदन : जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाची मागणी

As the incidence of corona increases, stop searching for children | कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, मुलांची शोध मोहीम थांबवा

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, मुलांची शोध मोहीम थांबवा

Next

जळगाव : शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष शोध मोहीम राबविली जात आहे़ नियुक्त शिक्षकांना प्रत्यक्ष घरोघरी फिरून माहिती गोळा करावयाची आहे. परिणामी, शिक्षकांना कोरोना होण्याची भीती नाकारता येत नाही. त्यामुळे शाळाबाह्य मुलांच्या शोध मोहिमेला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षण संघाच्यावतीने जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे सेके्रटरी शालिग्राम भिरूड यांची स्वाक्षरी आहे.

शिक्षकांना लस द्यावी
अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव येथे कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. शिक्षकही मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह आढळत आहे. अश्या परिस्थिती शाळाबाह्य मुलांचा शोध घेणे योग्य नाही. त्यामुळे ही मोहीम थांबवावी व त्याआधी शिक्षकांना कोरोना लस द्यावी अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण जाधव यांनी केली आहे.

 

Web Title: As the incidence of corona increases, stop searching for children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.