एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात हायटेक लॅबचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:19 AM2021-01-19T04:19:44+5:302021-01-19T04:19:44+5:30

जळगाव : एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालय, बांभोरी, येथे हायटेक रोबोटिक्स लॅबचे उद्घाटन नॅशनल इन्फोमेटिक सेंटरचे शास्त्रज्ञ प्रमोद बोरोले ...

Inauguration of Hi-Tech Lab at SSBT College of Engineering | एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात हायटेक लॅबचे उद्घाटन

एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात हायटेक लॅबचे उद्घाटन

Next

जळगाव : एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालय, बांभोरी, येथे हायटेक रोबोटिक्स लॅबचे उद्घाटन नॅशनल इन्फोमेटिक सेंटरचे शास्त्रज्ञ प्रमोद बोरोले महाराष्ट्र राज्य यांच्याहस्ते झाले. प्राचार्य डॉ. के. एस. वाणी, उपप्राचार्य डॉ. एस. पी. शेखावत, ई अँड टी. सी. विभागप्रमुख, डॉ. शेखर सुरळकर, डॉ. पी.एच. झोपे, डॉ. पी.जे. शाह, डॉ. पी.व्ही. ठाकरे, डॉ. एम.पी. देशमुख, डॉ. व्ही.एम. देशमुख, प्रा. एन.एम. काझी, प्रा. अमोल वाणी, प्रा. अतुल करोडे, प्रा. सुरेंद्र रामटेके, प्रा. सुनील खोडे तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

ई.अँड टी.सी. विभागाने आय.आय.टी., मुंबई यांच्या सहकार्याने ई यंत्र रोबोटिक्स लॅबची स्थापना केली आहे. या अंतर्गत ई यंत्र लॅब सेटअप इनिशिएटिव्हच्याद्वारे प्राध्यापक व सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रोजेक्ट बेस लर्निंग ही सुविधा उपलब्ध होणार आहे व त्यासाठी आय.आय. टी., मुंबईचे मार्गदर्शन लाभणार आहे. याकरिता ई. अँड टी. सी. विभागातून प्रा. अमोल वाणी व डॉ. पी. एच. झोपे, यांनी ई यंत्राचे कार्यशाळा अंतर्गत आय.आय.टी., मुंबई येथे यशस्वीरीत्या प्रशिक्षण घेऊन तीन महिन्यांचे टास्क बेस ट्रेनिंग पूर्ण केले. या प्रशिक्षणावर आधारित नॅशनल लेवल स्पर्धा परीक्षेत संपूर्ण भारतातून सहभागी झालेल्या मोजक्या कॉलेजेसना ए ग्रेड मिळाले. त्यामध्ये क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ क्षेत्रात एस. एस. बी. टी. अभियांत्रिकी महाविद्यालय हे एकमेव आहे. उपस्थितांनी या वेळी मार्गदर्शन केले.

Web Title: Inauguration of Hi-Tech Lab at SSBT College of Engineering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.