पहूर हद्दीतील हातभट्ट्यांवर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 04:13 PM2020-04-01T16:13:54+5:302020-04-01T16:15:02+5:30

पाच गावातील हातभट्ट्या उद्ध्वस्त करून ८० हजारांचे रसायन नष्ट केले आहे,

Impressions on handcuffs in Pagur border | पहूर हद्दीतील हातभट्ट्यांवर छापे

पहूर हद्दीतील हातभट्ट्यांवर छापे

Next
ठळक मुद्दे८० हजाराचे रसायन नष्टपाच जणांविरुद्ध गुन्हा

पहूर, ता.जामनेर, जि.जळगाव : पहूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पाच गावातील हातभट्ट्या उद्ध्वस्त करून ८० हजारांचे रसायन नष्ट केले आहे, तर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा विभागाचे डीवाय.एस.पी. ईश्वर कातकडे, साहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी, साहाय्यक फौजदार अनिल अहिरे, अनिल देवरे, जितुसिंग परदेशी, जितेंद्र परदेशी, अनिल सुरवाडे, भरत लिंगायत यांनी परीसरात सुरू असलेल्या हातभट्ट्या उद्ध्वस्त करून ८० हजार किमतीचे तीन हजार ४०० लीटर रसायन नष्ट केले आहे. सचिन छाडेकर पाळधी, हुसेन सरदार तडवी चिलगाव, रोहिदास शांताराम मोरे वाकोद, लताबाई राजू म्हस्के तोंडापूर, विनोद हरसिंग पारधी, नवाब बोध तडवी रा.फत्तेपूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Impressions on handcuffs in Pagur border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.