हे राम...तब्बल 107 शिक्षक, शिक्षकेतर कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 11:29 PM2021-03-15T23:29:51+5:302021-03-15T23:30:39+5:30

प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळेतील असे एकत्रित  १०७ केंद्रप्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कोरोना बाधित आढळले आहेत.

Hey Ram ... 107 teachers, non-teaching corona interrupted | हे राम...तब्बल 107 शिक्षक, शिक्षकेतर कोरोना बाधित

हे राम...तब्बल 107 शिक्षक, शिक्षकेतर कोरोना बाधित

Next
ठळक मुद्देचोपडा तालुक्यातील स्थिती : अनेक शिक्षक भयभीत

लोकमत न्यूज नेटवर्क
चोपडा : शहर आणि तालुक्यातील प्राथमिक जिल्हा परिषदेच्या शाळा, खासगी प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळेतील असे एकत्रित  १०७ केंद्रप्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कोरोना बाधित असल्याचा अहवाल १५ रोजी प्राप्त झाला 
आहे. 
चोपडा तालुक्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. त्यातच सोमवारी प्राप्त अहवाल धक्कादायक ठरला आहे. त्यामुळे तालुक्यात यापुढे अख्ख्या शाळा पाॅझिटिव्ह येतात की काय अशी भीती निर्माण झाली आहे. 

पाॅझिटिव्ह शिक्षक माहिती 
पंकज प्राथ विद्यालय - २ शिक्षक, जि.प. शाळा गरताड २ शिक्षक, जि.प. शाळा निमगव्हाण २ शिक्षक, जि.प. शाळा कुंड्यापाणी २ शिक्षक, जि.प. शाळा चुंचाऴे २ शिक्षक, जि.प. शाळा दगडी बु. १ शिक्षक, जि. प. शाळा वेऴोदे १ शिक्षक, जि.प. शाळा हातेड १, जि.प. शाळा अजंतीसिम २, जि.प. शाळा दोंदवाडे २, जि.प. शाळा धानोरा १, जि.प. शाळा कठोरा १, जि.प.शाळा अनवर्दे बु १,जि.प.प. शाळा नं १ चोपडा १, जि.प.शाळा लासुर कन्या ३, जि.प. शाळाचौगाव ३, जि.प. शाळा वाऴकी ४,जि.प. शाळा आडगाव १, जि.प. शाळा कमळगाव १, जि.प. शाळा वर्डी २, जि.प. शाळा बोरखेडा २,जि.प.. शाळा गणपुर १, जि.प. शाळा रुखनखेडे प्रअ १, लिटल हार्ट इंग्लिश स्कूल चोपडा १, महिला मंडऴ प्राथ विद्यालय १, जि. प. शाळा काजीपुरा १,असे प्राथमिक शाळांमधून एकूण ४४ शिक्षक पाॅझिटिव्ह आले आहेत.

माध्यमिक विद्यालयातील पाॅझिटिव्ह शिक्षक संख्या पुढीलप्रमाणे.. 
पंकज माध्य विद्यालय - १ शिक्षक, महिला मंडळ माध्यमिक विद्यालय- ३ शिक्षक, प्रताप विद्या मंदिर -२ शिक्षक, कुरवेल हायस्कूल - ६ शिक्षक, ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल २, अडावद माध्य विद्यालय १, आडगाव माध्यमिक विद्यालय २, गोरगावले माध्य विद्यालय २, पंकज ग्लोबल स्कूल २, नागलवाडी माध्यमिक विद्यालय २, सनपुले आश्रम शाळा ३, लासूर माध्य विद्यालय ६, हातेड शिवाजी हायस्कूल १, सीबी निकुंभ हायस्कूल घोडगाव १, नागलवाडी माध्य विद्यालय ४, वैजापूर आश्रम शाळा १, असे एकूण माध्यमिक शिक्षक ४१ आहेत. दरम्यान शिक्षक मोठ्या प्रमाणावर कोरोना पाॅझिटीव्ह आढळल्याने तालुक्याच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शिक्षकेतर कर्मचारी पुढीलप्रमाणे पंकज विद्यालय १, कस्तुरबा विद्यालय १, बिडगाव विद्यालय २, अडावद माध्य विद्यालय ३, लासूर माध्यमिक विद्यालय १, महिला मंडळ माध्यमिक विद्यालय ५, नागलवाडी माध्य. विद्यालय १, ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल १, विवेकानंद विद्यालय २, प्रताप विद्या मंदिर १, कै. श्यामराव शिवराम माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय चहार्डी २, पंडित जवाहरलाल माध्यमिक विद्यालय अकुलखेडे १, असे एकूण २१ कर्मचारी तर केन्द्रप्रमुख १ पाॅझिटिव्ह झाले आहेत. तालुक्यात एकुण शिक्षक, शिक्षकेतर १०७ शिक्षक व कर्मचारी पाॅझिटिव्ह झाले आहेत. एकाच वेळी एवढी शिक्षक तसेच कर्मचारी बाधित आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Web Title: Hey Ram ... 107 teachers, non-teaching corona interrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.