भाजपला सर्वात जास्त मतदान मुस्लीम बांधव करतील - गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 11:07 PM2019-08-14T23:07:32+5:302019-08-14T23:08:17+5:30

निर्णयामुळे काश्मीरचे भविष्य उज्ज्वल

Girish Mahajan will be the most Muslim brother to vote for BJP | भाजपला सर्वात जास्त मतदान मुस्लीम बांधव करतील - गिरीश महाजन

भाजपला सर्वात जास्त मतदान मुस्लीम बांधव करतील - गिरीश महाजन

Next

जळगाव : गेल्या ७० वर्षांपासून सर्वांच्या ह्रदयावर लागलेला काश्मीरातील ३७० कलमची जखम पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या पुढाकाराने दूर झाली असून आगामी काळ हा काश्मीरसाठी खऱ्या अर्थाने सुवर्ण काळ ठरणार आहे, असा विश्वास गिरीश महाजन यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघातील शक्तीकेंद्र प्रमुखांच्या संघटनात्मक बैठकीत व्यक्त केला. या निर्णयामुळे काश्मीरचे भविष्य उज्ज्वल असून तेथील जीवनमान बदलण्यास मोठी मदत होणार आहे. सोबतच तिहेरी तलाकबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाने मुस्लीम भगिणी खूष आहे. त्यामुळे भविष्यात मुस्लीम बांधवच भाजपला सर्वात जास्त मतदान करतील, असा दावाही महाजन यांनी या वेळी केला.
आगामी विधानसभा निवडणुकीतही नियोजन केल्यास आपले हमखास यश आहे, असे सांगत त्यांनी दोन महिने मेहनत करा, आता कच खाऊ नका, असा सल्ला उपस्थितांना दिला.
नाथाभाऊ माझे पाठीराखेच
पूरग्रस्तांना मदत करीत असताना काढलेल्या सेल्फीमुळे सर्वांच्या टीकेचे धनी ठरलेले जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या समर्थनार्थ एकनाथराव खडसे पुढे सरसावले होते. माध्यमांनी गिरीश महाजन यांच्या चांगल्या कामाची दखल न घेता सेल्फी घेण्याच्या विषयावरून त्यांना नाहक लक्ष केले, अशी प्रतिक्रिया खडसेंनी महाजन यांची पाठराखण करताना दिली होती. या विषयावर गिरीश महाजन यांना या बैठकीनंतर विचारले असता ते म्हणाले की, नाथाभाऊ नेहमीच माझी पाठराखण करतात. एवढेच नाही तर आम्ही दोघेही नेहमी एकमेकांची पाठराखण करत असतो. परंतु, तुम्हाला माध्यमांना भलतंच काहीतरी वाटत असते. नाथाभाऊंनी माझी पाठराखण केली हे चांगलंच झालं, अशी प्रतिक्रियाही महाजन यांनी दिली. महाजन आणि खडसे यांच्यातील हाडवैर सर्वश्रुत आहे. मात्र, महाजन यांनी सावध प्रतिक्रिया देत आमच्यात सारं काही आलबेल असल्याचे भासवले. त्यामुळे खडसे व महाजन समर्थकांच्या भुवया उंचावल्या.
या वेळी गिरणा धरणात जळगाव जिल्ह्यातील इतर धरणांसाठी पाणी सोडले जाईल, असेही त्यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी निवडणूक पुढे ढकण्याच्या मागणीबाबत ते म्हणाले की, त्यांना स्वायत्तता आहे. त्यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी करावी. तसेच पूरग्रस्तांसाठी निधीचे नियोजन केले असून तो कमी पडू दिला जाणार नाही. तसेच मराठवड्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी विमानांची सोय केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Girish Mahajan will be the most Muslim brother to vote for BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.