वाळू डंपरच्या धडकेत पादचारी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 10:44 PM2020-01-27T22:44:04+5:302020-01-27T22:44:17+5:30

समर्थ कॉलनीतील घटना : चालक फरार, डंपर ताब्यात

 Foot pedestrian injured in sand damper crash | वाळू डंपरच्या धडकेत पादचारी जखमी

वाळू डंपरच्या धडकेत पादचारी जखमी

googlenewsNext

जळगाव : वाळूने भरलेल्या डंपरने धडक दिल्याने शेख अकिल शेख रसीद (३५, रा.पिंप्राळा) हा पादचारी जखमी झाल्याची घटना समर्थ कॉलनीत घडली. नागरिकांनी डंपर अडवून पोलिसांच्या ताब्यात दिले तर चालक फरार झाला होता. जखमीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ,प्रभात चौकाच्या नजीकच असलेल्या समर्थ कॉलनीतून जाणाऱ्या वाळूच्या डंपरने अ‍ॅड.ज्योती सुनील भोळे यांच्या घराच्यासमोरच पायी जात असलेल्या शेख अकिल या पेंटरला वाळूने भरलेल्या डंपरने (क्र.एम.एच.१९-५०७१) धडक दिली, त्यात पायाला गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्याचे लक्षात येताच राम सनेर व अ‍ॅड.ज्योती भोळे यांनी धाव घेऊन जखमीला दवाखान्यात हलविले. यावेळी डंपर चालक फरार झाला. अ‍ॅड.भोळे यांनी रामानंद नगर पोलिसांना घटना कळविल्यानंतर पोलिसांनी डंपर ताब्यात घेतले. दरम्यान, अ‍ॅड.ज्योती भोळे यांनी तहसीलदार वैशाली हिंगे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी डंपर चालकांना परमीट वाटप केल्याचे सांगून पोलिसांना घटना कळविण्याचा सल्ला दिला.

Web Title:  Foot pedestrian injured in sand damper crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.