Focus on 'Yoga' for a healthy, vibrant life | निरोगी, उत्साहपूर्वक आयुष्यासाठी ‘योगा’वर भर
निरोगी, उत्साहपूर्वक आयुष्यासाठी ‘योगा’वर भर

जळगाव : धावपळीच्या जीवनामुळे प्रत्येकाचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते़ त्यातचं प्रत्येकजण कोणत्या न कोणत्यातरी आजाराने ग्रासलेला आहे़ यावर उपाय काय असा सर्वांना पडतो़ यावर उत्तम पर्याय म्हणजे योगा़ त्यामुळे निरोगी आणि उत्साहपूर्वक आयुष्य जगण्यासाठी नियमित योगा करावा, असा सल्ला गेल्या १५ ते २० वर्षापासून योगाशी नाळ जुळलेल्या नागरिकांकडून देण्यात येत आहे.
हळू-हळू थंडीमध्ये वाढ होत आहे़ त्यामुळे स्वास्थ कमविण्यासाठी शहरातील भाऊंचे उद्यान, गांधी उद्यान, बहिणाबाई उद्यान, तसेच एम़जे़ महाविद्यालयात सोहम योगा केंद्रासह विविध खाजगी क्लासेसमध्ये योगा आणि प्राणायम करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे़ यावेळी लहानांपासून तर वयोगवृध्दांपर्यत सर्व जण आपआपल्या आवडीचे योग करताना दिसून येत आहेत़
योग साधकांची भरली शाळा
शरीर आणि मन एकाग्र करणे म्हणजे योग. परंतु धावपळीच्या युगामध्ये ८० टक्के आजार मानसिकतेमुळे व शरिराला व्यायामच मिळत नसल्यामुळे निर्माण होता़ त्यामुळे हा मानसिक तणाव दूर करण्याठी भाऊंचे उद्यान येथे योग साधकांची नियमिती शाळा भरते़ दुसरीकडे बाजूलाच अनेकजण आपल्या आवडीनुसार योग साधना करतात़ गांधी उद्यान व बहिणाबाई येथेही योग साधक मन एकाग्र करण्यासाठी ध्यान साधनेत तल्लीन झालेले बघायला मिळाले़
महिला घेतायं योगाचे धडे
शहरातील मू़जे़ महाविद्यालयात सोहम योग विभागासह शहरातील विविध ठिकाणी खाजगी क्लासेसमध्ये योग प्रशिक्षण दिले जात आहे़ थंडीत वाढ झाल्यामुळे या खाजगी क्लासेसमध्येही महिला वर्गाची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसून येत आहे़ दरम्यान, शिवकॉलनी परिसराती शंभर फुटी रस्ता, पिंप्राळा रस्ता, मोहाडी रस्ता, काव्यरत्नावली चौक आदी भागांमध्येही मिळेल त्याठिकाणी योग साधना करताना नागरिक दिसून येत आहेत़
योगातून मनशुद्धी
योगासन, प्राणायम, प्रत्यहार, ध्यान, धारणा यासह हट योग, ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तीयोग, राजयोग आदी योगाचे विविध प्रकारही योगशिक्षकांकडून शिकविण्यात येत आहेत. हटयोगामुळे शरीरशुद्धी, राजयोगातून मनाच्या समाधी अवस्थेत जाण्याची तयारी कशी करावी, योगनियमातून मनाची शुद्धी कशी करावी, भक्तीयोगातूनसाधना कशी करावी, विलोम आदींचा समावेश आहे

असे आहेत प्रमुख योग प्रकार

योगामध्ये राजयोग, हठयोग, लययोग, ज्ञानयोग, कर्मयोग व भक्तियोग असेही प्रमुख प्रकार आहेत़ त्यामध्ये या प्रमुख योग प्रकारांचे विविध अंग आहेत़ त्यात राजयोगमध्ये यम, नियम, आसन, प्राणायम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी, हे पतंजली राजयोगाचे आठ अंग आहेत. हठयोगमध्ये षट्कर्म, आसन, मुद्रा, प्रत्याहार, ध्यान व समाधी, हे हठयोगाचे सात अंग आहेत. तसेच लययोगमध्ये यम, नियम, स्थूल क्रिया, सूक्ष्म क्रिया, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी असे लययोगाचे आठ अंग आहेत. ज्ञानयोगमध्ये अशुध्द आत्म्याचे ज्ञान प्राप्त करणे, हाच ज्ञानयोग आहे. याला ध्यानयोग असे ही म्हटले जाते. कर्मयोगमध्ये कर्म करणेच कर्मयोग आहे. कर्माने आल्यात कौशल्य आत्मसात करणे, हा त्यामागील खरा उद्देश आहे. भक्तियोग भक्ति, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सौख्य व आत्मनिवेदन असे नऊ गुण असणाऱ्या व्यक्तीला भक्त म्हटले जाते. व्यक्ती त्याची आवड, प्रकृत्ती व साधना यांच्या योग्यतानुसार त्याची निवड करू शकतो. भक्ती योगानुसार सौख्य, समन्वय, आपुलकी असे गुण निर्माण होतात.

योगाचे फायदे
-सर्व स्तरांवर तंदुरुस्ती
-वजनात घट
-ताण -तणावापासून मुक्ती
-अंर्तमनात शांतता
-रोगप्रतिकारक शक्तीत वाढ
-उर्जा शक्ती वाढते
-शरीराचा लवचिकपणा आणि शरीराची ठेवण सुधारते
-अंतज्ञार्नात वाढ

Web Title:  Focus on 'Yoga' for a healthy, vibrant life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.