जळगावात सकाळी साडे दहा वाजता येणार पहिला निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:15 AM2021-01-18T04:15:17+5:302021-01-18T04:15:17+5:30

- मतदान झालेल्या ग्रामपंचायती - ६८७ - झालेले मतदान - ७८.११ - निवडणूक लढविलेले उमेदवार - ५१५४ लोकमत न्यूज ...

The first result will come in Jalgaon at 10.30 am | जळगावात सकाळी साडे दहा वाजता येणार पहिला निकाल

जळगावात सकाळी साडे दहा वाजता येणार पहिला निकाल

Next

- मतदान झालेल्या ग्रामपंचायती - ६८७

- झालेले मतदान - ७८.११

- निवडणूक लढविलेले उमेदवार - ५१५४

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यातील ६८७ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतदानमोजणी सोमवार, १८ जानेवारी रोजी होणार असून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. मतमोजमीची वेळ जसजशी जवळ येत आहे तसतशी सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचत आहे. पहिला निकाल मतमोजणी सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासात समोर येणार आहे.

जिल्ह्यात ७८३ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यानंतर माघारीच्या दिवसापर्यंत ९३ ग्रामपंचायती बिनविरोध ठरल्या होत्या. त्यानंतर जिल्ह्यात शुक्रवार, १५ जानेवारी रोजी सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेदरम्यान ६८७ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. जिल्ह्यात एकूण ७८.११ टक्के मतदान झाले होते.

सोमवारी सकाळी १० वाजता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होऊन दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून मतमोजणी केंद्रांवर ग्रामपंचायतींच्या संख्येनुसार टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.

अर्ध्या तासात पहिला निकाल

मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिला निकाल मतमोजणी सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासात समोर येणार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कोणत्या ग्रामपंचायतपासून सुरूवात होईल, त्या ग्रामपंचायतीचा पहिला निकाल समोर येणार आहे. यात जळगाव तालुक्यात शिरसोली प्र.बो. ग्रामपंचायतपासून सुरुवात होणार असून या ग्रामपंचायतीचा सकाळी साडेदहा वाजेपर्यंत निकाल प्रथम समोर येणार आहे.

जामनेर तालुक्यात सर्वाधिक मतदान

जिल्ह्यात सर्वाधिक ८२.४५ टक्के मतदान जामनेर तालुक्यात तर सर्वात कमी ६७.९६ टक्के मतदान भुसावळ तालुक्यात झाले होते.

मतमोजणी केंद्रांवर पोलीस बंदोबस्त

जिल्ह्यात प्रत्येक मतमोजणी केंद्रांवर उमेदवार व त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने सर्वच केंद्रांवर पोलीस बंदोबस्त राहणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने स्थळ व वेळ निश्चित

ग्रामपंचायतीसाठी झालेल्या मतदानानंतर होणाऱ्या मतमोजणीची वेळ व स्थळांना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

————

जिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व निकाल लागण्याची शक्यता आहे.

- रवींद्र भारदे, उपजिल्हाधिकारी (महसूल) तथा जिल्हा नोडल अधिकारी, ग्रामपंचायत निवडणूक.

Web Title: The first result will come in Jalgaon at 10.30 am

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.