A firefighting woman's house in Dhaba | धाबे येथे निराधार महिलेच्या घराला आग
धाबे येथे निराधार महिलेच्या घराला आग


पारोळा: तालुक्यातील धाबे या ठिकाणी २८ रोजी रविवारी सकाळी दहा वाजता अचानक शॉर्टसर्कीटने निराधार महिलेच्या घराला आग लागून सुमोर पन्नास हजाराचे संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले. याचबरोबर बकऱ्यांच्या शेडचेही नुकसान झाले.
धाबे येथील जि .प. प्राथमिक शाळेच्या मागे राहणारी निराधार महिला अनुबाई मानसिंग भिल हीस या आगीची झळ बसली आहे. तिने ऊन्हामुळे स्वत: राहण्यासाठी व बोकड बांधण्यासाठी कुडाची झोपडी बनविली होती. अचानक ठिणग्या उडून शॉर्टसर्किट झाले व आग लागली. यावेळी गांवकऱ्यांनी धाव घेत झोपडीतील आठ बोकड बाहेर काढले. या दरम्यान आगीने रौद्ररुप धारण केले. त्यामुळे झोपडीत असलेले संसारोपयोगी कपडे, धान्य, आंथरुण व अमळनेरच्या सोमवारच्या बाजारातुन घ्यावयाचे दोन बोकड यासाठी ठेवलेले पैसे रोख १२ हजार २०० रुपये जळुन खाक झाले.
या आगीमुळे लगतच असलेली दसनुर तडवी यांचीही झोपडी थोडी जळाली. श्रीमती बनुबाई यांची झोपडी काही प्रमाणात जळाली. काही अंतरावर असणाºया लिंबाच्या झाडालाही झळा बसल्या. गांवकºयांनी शर्थीचे प्रयत्न करून आग अटोक्यात आणली. पारोळा नगर पालिकेची अग्नीशमन गाडीही वेळेवर पोहचली म्हणुन मोठा अनर्थ टळला. सोमवारी नऊ वाजता धाबे हिरापूर तलाठी के. टी. सानप यांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. अनुबाई या एकटया असून निराधार आहे. बकºया व बोकड पालन खरेदी विक्रीतुन त्या आपला उदरर्निवाह करतात. सर्वच जळुन खाक झाल्यामुळे त्या हवादिल झाल्या आहेत. त्यांना शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे, तलाठी के. टी. सानप, वीर एकलव्य बजरंग ग्रुप धाबे शाखेचे अध्यक्ष रविंद्र भिल, ग्राम पंचायत कर्मचारी शामा भिल यांनी धीर दिला व मदत मिळवुन देण्याचे आश्वासन दिले.


 


Web Title: A firefighting woman's house in Dhaba
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.