जामनेरला ६०० शेतकऱ्यांना थेट बांधावर खत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 03:37 PM2020-06-05T15:37:14+5:302020-06-05T15:38:43+5:30

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

Fertilizer on Jamner directly to 600 farmers | जामनेरला ६०० शेतकऱ्यांना थेट बांधावर खत

जामनेरला ६०० शेतकऱ्यांना थेट बांधावर खत

Next
ठळक मुद्देशेतकरी गटामार्फत पुरवठा सुरूकोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी सेवा केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी उपक्रममागणी केल्यास त्यांना थेट बांधावर अथवा घरपोच खते आणि बियाणांचा पुरवठा

जामनेर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी सेवा केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी तालुका कृषि विभागाच्या वतीने थेट बांधावर खत हा उपक्रम राबविला जात असून, याअंतर्गत ३० शेतकरी गटामार्फत ६०० शेतकऱ्यांना खत बियाणांचा पुरवठा करण्यात आला आहे.
मे महिन्यापासून कृषी अधिकारी अभिमन्यू चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यक,मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक यांनी गावस्तरावर जनजागृती मोहीम राबवली होती. त्याअंतर्गत शेतकरी गटाची माहिती देण्यात आली या मोहिमेअंतर्गत शेतकरी गटांनी कृषी विभागाकडे खते व बियाणांची मागणी केल्यास त्यांना थेट बांधावर अथवा घरपोच खते आणि बियाणांचा पुरवठा केला जात आहे.
जूनच्या सुरुवातीपर्यंत ३० गटामार्फत शेतकºयांना विविध प्रकारची खते बियाणांचा पुरवठा करण्यात आला जवळपास ६५० शेतकºयांना ६७८ मेट्रिकटन खत व १० क्विंटल बियाणांचा पुरवठा करण्यात आला असल्याची माहिती कृषी अधिकारी अभिमन्यू चोपडे यांनी दिली. शेतकºयांनी घरगुती सोयाबीन बियाणांचा वापर करावा यासाठीही कृषी सहायकांच्या मदतीने सोयाबीन बियाणे उगवण क्षमता प्रत्यक्षिक गावोगावी घेतले जात आहे त्यामुळे खरीप हंगामासाठी कृषी विभागाच्या वतीने सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे तसेच तालुका कृषि विभागाच्या वतीने शेतकºयांना खते व बियाणांचा पुरवठा केला जात आहे. त्या अनुषंगाने तालुकानिहाय नियोजनही करण्यात आले आहे. विशिष्ट कंपनीच्या बियाणाचा अथवा खतांचा शेतकºयांनी आग्रह करू नये, असे आवाहनही कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
 

Web Title: Fertilizer on Jamner directly to 600 farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.