सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे महिलांमध्ये भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:15 AM2021-01-17T04:15:27+5:302021-01-17T04:15:27+5:30

सर्वाधिक घटना या फुले मार्केट व बसस्थानकात घडत आहेत. २ जानेवारी रोजी एकाच दिवशी बाजारात लग्नाच्या खरेदीसाठी आलेल्या मंगला ...

Fear among women due to increasing incidence of gold chain theft | सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे महिलांमध्ये भीती

सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे महिलांमध्ये भीती

Next

सर्वाधिक घटना या फुले मार्केट व बसस्थानकात घडत आहेत. २ जानेवारी रोजी एकाच दिवशी बाजारात लग्नाच्या खरेदीसाठी आलेल्या मंगला पाटील यांच्या पर्समधून ४२ हजाराची रोकड लांबविण्यात आली. त्यानंतर लागलीच थोड्यावेळाने ऐश्वर्या पाटील यांची सोनसाखळी लांबविण्यात आली. दोन्ही घटना फुले मार्केटमध्ये घडल्या. त्यानंतर पुन्हा ९ जानेवारी रोजी दोन घटना घडल्या. मुलाला कपडे घेण्यासाठी आलेल्या शिरसोली येथील सरला पाटील यांचे तर सौभाग्याचे लेण असलेले मंगळसूत्रच दाणाबाजारातून लांबविण्यात आले. त्यानंतर सरला हाडे या विवाहितेचीही सोनासाखळी लांबविण्यात आली.

हुल्लडबाजी करत दुचाकीस्वारांकडून मोबाईल लंपास

दुचाकीवरुन आलेल्या तरुणांकडून रस्त्याने पायी चालणाऱ्या लोकांचे मोबाईल लांबविण्याच्या घटनाही रोज घडत आहेत. १३ जानेवारी रोजी शतपावली करणाऱ्या राजेश भगवान सोनार यांच्या हातातील मोबाईल संभाजी नगरातून लांबविण्यात आला तर त्याच दिवशी काव्यरत्नावली चौकातून महिलेच्या हातातून मोबाईल लांबविण्यात आला. रामदास कॉलनीकडे जाणार्‍या रस्त्यावर आई वडीलांसह शतपावली करत असतांना शुभम दिलीप भिरुड या तरुणाचा मोबाईलही शुक्रवारी लांबविण्यात आला. सलगच्या घटनांमुळे पादचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

अशा आहेत घटना

२ जानेवारी : मंगला पाटील (खोटे नगर) यांची ४२ हजार रुपये असलेली पर्स फुले मार्केटमधून लांबविली

२ जानेवारी : ऐश्वर्या रामकृष्ण सपकाळे (रा.खोटे नगर) यांची सोनसाखळी फुले मार्केटमधून लांबविली

८ जानेवारी : जितेंद्र हुकुमचंद शर्मा (रा.पारोळा) यांचा मोबाईल बसस्थानकातून लांबविला

९ जानेवारी : सरला गजानन हाडे (रा.कांचन नगर) यांची सोनसाखळी गांधी मार्केटमधून लांबविली

९ जानेवारी : सरला सुनील बारी (रा.शिरसोली) यांचे मंगळसूत्र दाणाबाजारातून लांबविले

Web Title: Fear among women due to increasing incidence of gold chain theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.