व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक, हमीभावापेक्षा सहाशे रुपये कमी दराने विक्री करावी लागतेय दादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 09:40 PM2020-04-09T21:40:58+5:302020-04-09T21:41:30+5:30

अमळनेरला ३४०० तर जळगावात २८०० रुपये भाव

Farmers are being forced to sell merchandise at a rate of Rs. Six hundred less than guarantee. | व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक, हमीभावापेक्षा सहाशे रुपये कमी दराने विक्री करावी लागतेय दादर

व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक, हमीभावापेक्षा सहाशे रुपये कमी दराने विक्री करावी लागतेय दादर

Next

जळगाव : कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने बाजार समितीतील लिलाव बंद आहेत. मात्र, रब्बीची दादर, बाजरीची खरेदी काही प्रमाणात सुरु आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाºयांकडून शेतकºयांची पिळवणूक सुरु आहे. दादर व बाजरी तब्बल सहाशे रुपये कमी दराने खरेदी केली जात आहे. यावर बाजार समिती प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मात्र मौन पाळून आहेत.
यंदा दादरची गुणवत्ता चांगली असतानाही भाव न मिळत असल्याने शेतकºयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. खरीपातील उडीद,मूग असो वा रब्बीतील हरभरा, गहू, दादर, मक्यासह केळी व कापूस या पिकांना हमीभाव निश्चित केला असतानाही श्ेतकºयांना हमीभावाप्रमाणे भाव मिळत नाही. व्यापाºयांकडून शेतकºयांची नियमित  लुट सुरु आहे.  यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेल्यानंतर रब्बीचे उत्पादन काही प्रमाणात चांगले झाले. मात्र, आता उत्पादन चांगले होवून देखील मालाच्या गुणवत्तेनुसार भाव मिळत नसल्याने बळीराजा उध्वस्त झाला आहे. ज्यावर्षी मालाला चांगला भाव असतो त्या वर्र्षी निसर्ग पाठ दाखवतो, तर ज्यावर्षी निसर्ग चांगला बरसतो त्यावर्षी मात्र व्यापारी शेतकºयांची पिळवणूक करत असतात. 
अमळनेर बाजार समितीत दादरचा भाव प्रतिक्विंटल ३४०० रुपये इतका आहे. मात्र, जळगाव बाजार समितीत २८०० रुपये दराने दादर खरेदी केली जात आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी दादरचा बाजारभाव ३६०० रुपये इतका होता. मात्र, गुणवत्तेच्या नावाखाली व्यापाºयांकडूून शेतकºयांची लुट सुरु आहे. यंदा चांगल्या पावसामुळे रब्बीतील पिकांची गुणवत्ता चांगली आहे. त्यातल्या त्यात दादरची गुणवत्ता देखील चांगली आहे. मात्र, व्यापाºयांकडून दादरच्या  गुणवत्तेत अनेक दोष काढले जात आहेत. त्यातच लॉकडाऊनची परिस्थिती असल्याने नाईलाजास्तव बाजार समितीतील व्यापाºयांना माल विक्री करावा लागत आहे. 
शेतकरी आज देणार निवेदन
 बाजार समितीमध्ये शेतकºयांची सुरु असलेल्या लुटीबाबत असोदा, आव्हाणे, कानळदा येथील काही शेतकरी बाजार समिती सभापती व जिल्हा उपनिंबधक यांना निवेदन देणार आहेत.  

यंदा खरीपचा हंगाम वाया गेल्यानंतर निदान रब्बीच्या हंगामातून शेतकºयांना लाभ मिळेल अशी अपेक्षा होती. ती आशाही धुळीस मिळाली आहे. लॉकडाऊनचा फायदा व्यापाºयांकडून घेतला जात असून, शेतकºयांचा सहनशिलतेचा अंत पाहिला जात आहे.
-किशोर चौधरी, शेतकरी, असोदा ता. जळगाव.

अमळनेर व जळगाव बाजार समितीच्या भावात फरक आहे. क्विंंटल मागे ६०० रुपयांचे नुकसान श्ेतकºयांना सहन करावे लागत आहे. शेतकºयांचा व्यथांकडे बाजार समिती प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. 
-अ‍ॅड.हर्षल चौधरी, शेतकरी, आव्हाणे ता. जळगाव.

Web Title: Farmers are being forced to sell merchandise at a rate of Rs. Six hundred less than guarantee.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव