९ बँकांमध्ये उघडले बनावट खाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:14 AM2021-06-25T04:14:09+5:302021-06-25T04:14:09+5:30

जळगाव : म्युच्युअल फंडच्या माध्यमातून पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून ऑनलाइन गंडा घालणाऱ्या सचिन राम गुप्ता (रा.दिल्ली) याने त्याचा ...

Fake accounts opened in 9 banks | ९ बँकांमध्ये उघडले बनावट खाते

९ बँकांमध्ये उघडले बनावट खाते

Next

जळगाव : म्युच्युअल फंडच्या माध्यमातून पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून ऑनलाइन गंडा घालणाऱ्या सचिन राम गुप्ता (रा.दिल्ली) याने त्याचा सहकारी विकास सुरींदर कपूर (रा.दिल्ली) याच्या मदतीने वेगवेगळ्या नावाने दिल्लीतील ९ बँकांमध्ये बनावट खाते उघडून पैसे काढल्याचे उघड झाले आहे. सचिन गुप्ता याला गुरुवारी न्यायालयाने २७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. गुप्ता याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २३ जून रोजी दिल्लीतून अटक केली.

वामन काशिराम महाजन (रा.अंतुर्ली, ता.मुक्ताईनगर) या शेतकऱ्याला १ कोटी ७३ लाख ८९ हजार ९४५ रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याची घटना घडली. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसांनी विकास सुरींदर कपूर (रा.दिल्ली) कपूर याला दिल्लीतून अटक केली होती. तो अद्यापही पोलीस कोठडीत आहे. या दोघांनी वेगवेगळ्या नऊ बँकांमध्ये एफटीडी सर्व्हिस व शेखर शर्मा या बनावट नावाने खाते उघडले असल्याचे तपासात समोर आले आहेत. दरम्यान अशा पध्दतीने फसवणूक करणारी सात ते आठ जणांची टोळी असून इतरांचाही पोलिसांकडून शोध सुरू आहे.

Web Title: Fake accounts opened in 9 banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.