नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 02:36 PM2020-04-01T14:36:42+5:302020-04-01T14:37:53+5:30

नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरळ पुढील वर्गात प्रवेश देण्यात यावा

Enroll students in classes IX and XII into the next class | नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश द्या

नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश द्या

Next
ठळक मुद्देआमदार स्मिता वाघ यांची मागणीशालेय शिक्षण मंत्र्यांकडे दिले निवेदनदहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करून सरासरी गुण द्या

अमळनेर, जि.जळगाव : येत्या १५ एप्रिलपर्यंत सर्व परीक्षा आटोपणे शक्य नाही. यामुळे नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरळ पुढील वर्गात प्रवेश देण्यात यावा आणि दहावीच्या भूगोलाचा पेपर रद्द करून इतर विषयांच्या सरासरीप्रमाणे गुण देण्यात यावेत, अशी मागणी आमदार स्मिता वाघ यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कोविड-१९ आजाराच्या सतत वाढत जाणाऱ्या संसगार्मुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचे लॉकडाऊन केले आहेश्र सर्वत्र बंद असल्यामुळे शिक्षण विभागाने यापूर्वीच पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करून विद्याथ्यार्ना पास करण्याचे आदेश दिले आहेत. पहिली ते बारावीच्या परीक्षा १५ एप्रिलच्या आत होत असतात. मात्र लॉकडाऊनमुळे आता शक्य नाही. अशा परिस्थिीत नववी व अकरावीच्या परीक्षादेखील रद्द करून विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश द्यावा. तसेच दहावीच्या भूगोल विषयाचा पेपर स्थगित करण्यात आला आहे. पुढील वर्षाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून भूगोलाचा पेपर रद्द करून इतर विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात यावा, अशी मागणीही आमदार वाघ यांनी केली आहे

Web Title: Enroll students in classes IX and XII into the next class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.