Education flames among tribal brothers | आदिवासी बांधवांमध्ये शिक्षण ज्योत पेटल्याने टमटम, फटफटी बंद!

आदिवासी बांधवांमध्ये शिक्षण ज्योत पेटल्याने टमटम, फटफटी बंद!

ठळक मुद्देसंडे अँकरआदिवासी दिन विशेषफासेपारधी समाजातील लेकरांच्या नावांनाही ‘नवा लूक’


मतीन शेख
मुक्ताईनगर, जि.जळगाव : फासेपारधी समाजात शिक्षणाअभावी अगदी जन्माला घातलेल्या बालकाचे नाव फटफटी, बुलेट, राजदूत, बिस्कीट, टमटम, गुलिस्तान, बुलिस्टरनी, बंदूक अशी ठेवण्याचा कालपर्यंतचा प्रवास. अज्ञान व अशिक्षितपणामुळे ठेवली जात होती. मात्र शिक्षणाचा दिवा पेटल्यानंतर पहिली क्रांती जन्माला आलेल्या मुलांचे नाव प्रतिष्ठित आणि अर्थपूर्ण नाव बालकांना आता साज चढवायला लागला आहे.
देशातील विविध तीर्थक्षेत्रावर माळा, मणी, रुद्राक्ष विक्री हा त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रमुख व्यवसाय. अशिक्षितपणा आणि मागासलेल्या या फासेपारधी समाजात अलीकडे शिक्षणाचा दिवा पेटला आहे. माध्यमिक शिक्षणापाठोपाठ पदवी शिक्षणाकडे फासेपारधी मुलांचा कल वाढत आहे.
या समाजातील कृष्णा भोसले हा द्वितीय वर्ष कला शाखेत शिक्षण घेत आहे. तो या भागातील फासेपारधी समाजातील आजचा उच्च शिक्षित आहे. त्याला शिक्षण पूर्ण करून पोलीस खात्यात भरती व्हायचे आहे, तर हलखेडा येथील ज्योती देवराज चव्हाण ही मुलगी बारावी पास असून, ती महिलांमध्ये समाजात उच्च शिक्षित तरुणी गणली जात आहे. चंद्रशेखर पवार, शिव किशन भोसले, दयाल भोसले यांनी बारावीपर्यंत माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आहे. मुलांच्या शिक्षणासाठी जागृत झालेला हा समाज शासनाच्या योजना आदिवासी हक्काबाबतही जागृत झाला आहे.
तालुक्यातील मधापुरी, हलखेडा, लालगोटा या चार गावांमध्ये फासेपारधी वास्तव्यास आहेत. अशिक्षित परंतु देशभरातील तीर्थक्षेत्रावर माळा, मणी, रुद्राक्ष विक्री हा त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रमुख व्यवसाय. या फासेपारधी समाजाने अलीकडे शिक्षणाची कास धरली आहे.
तीन गावांमध्ये सव्वादोनशे मुले शिकताहेत
गावातील जिल्हा परिषद शाळेपासून तर थेट इंग्रजी माध्यमाच्या माध्यमिक शाळांमध्ये त्यांची मुलं शिक्षण घेऊ लागली आहेत. शिक्षणासाठी कुºहा आणि मुक्ताईनगर येथे त्यांचे मुले येऊ लागली आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेत असलेल्या फासेपारधी बालकांमध्ये शिक्षणाची जिद्द दिसून येत आहे. दुसरीकडे मराठी पाठोपाठ इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये जाणारे त्यांचे पाल्य पटापट इंग्रजी बोलू लागले आहेत. तीन हजारांच्या घरात लोकसंख्या असलेल्या या समाजातील जवळपास २२५च्या घरात मुले मराठी पाठोपाठ इंग्रजी, सेमी इंग्रजी शाळांमध्ये शिक्षण घेण्यास गावाबाहेरील शाळेत जात आहेत.

Web Title: Education flames among tribal brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.