Due to the 'Design' of the highway four-dimensional is left to be sanctioned, | महामार्ग चौपदरीकरणाच्या ‘डिझाईन’ला मंजुरी मिळणे बाकी असल्याने भूमीपूजनात सावधगिरी
महामार्ग चौपदरीकरणाच्या ‘डिझाईन’ला मंजुरी मिळणे बाकी असल्याने भूमीपूजनात सावधगिरी

जळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून विविध अडथळ््यांची शर्यत करीत अखेर मंजुरी मिळून निविदा निघालेल्या राष्टÑीय महामार्ग क्र.५३च्या (जुना राष्ट्रीय महामार्ग क्र.६) शहरातील ८ किमी लांबीच्या चौपदरीकरण कामाच्या १९ जुलैचा भूमीपूजनाचाही मुहूर्त टळला आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते हे भूमीपूजन होणार होते, मात्र जिल्हा नियोजन विकास समितीची बैठक व निवेदन देणाऱ्यांची संख्या पाहता पालकमंत्र्यांना वेळच मिळाला नसल्याचे कारण सांगितले जात आहे. मात्र या कामाच्या डिझाईनला अद्याप मंजुरी मिळणे बाकी असल्याने विनाकारण घाई करणे योग्य ठरणार नाही, यामुळे सावधगिरी बाळगली गेली असल्याचेही सांगितले जात आहे.
शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्ग क्र.५३ (जुना राष्ट्रीय महामार्ग क्र.६)चे चौपदरीकरण तसेच समांतर रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आहे. दररोज अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला तर कित्येक जण जखमी झाले. त्यामुळे यासाठी अनेक आंदोलने झाली. अनेक वेळा यासाठी केवळ आश्वासनावर बोळवण केली गेली. अखेर फेब्रुवारी महिन्यात निविदा प्रक्रिया सुरू झाली व आलेल्या निविदांपैकी गुडगाव येथील जेसीसी या कंपनीला हे काम देण्यात आले. यात कंपनीचा करारही झाला.
त्यामुळे चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा झाला. शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गाच्या ८ किमी लांबीचे चौपदरीकरण करणे व ३ चौकांमध्ये व्हेईकल अंडरपास (वाहनांसाठी भुयारी मार्ग) व १ पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग होणार आहेत.
या कामाचे १९ जुलै रोजी आकाशवाणी चौकात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते भूमीपूजन करण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून विविध अडथळे येणाºया या कामाचे भूमीपूजनही टळले. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते हे भूमीपूजन होणार होते तरी या ठिकाणी कोणी फिरकलेही नाही. याच दिवशी जिल्हा नियोजन विकास समितीची दुपारी १ वाजता गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होती. सोबतच पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेल्या विविध संघटना व निवेदन देणाºयांची संख्या मोठी असल्याने पालकमंत्र्यांना भूमीपूजनासाठी वेळच मिळाला नसल्याचे सांगितले जात आहे.
‘डिझाईन’ला मंजुरी मिळणे बाकी
कंपनीशी करार झाला असला तरी या कामाच्या डिझाईनला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. हैद्राबाद येथे हे डिझाईन मंजुरीसाठी पाठविले आहे. मात्र त्याच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. आठवडाभरात या डिझाईनला मंजुरीदेखील मिळून जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
घाई टाळली
१९ रोजी भूमीपूजनाचे ठरविण्यात आल्यानंतर शहरवासीयांचा रोष शमविण्यासाठी भूमीपूजनाची घाई केली जात असल्याचा आरोप होण्यासह तसे वृत्तही ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्यात आता डिजाईनला मंजुरी मिळणे बाकी असल्याने विनाकारण घाई करणे योग्य होणार नाही, यामुळे हे भूमीपूजन करण्यात सावधगिरी बाळगली गेल्याचे सांगितले जात आहे.
कामामुळे दिलासा
या कामाचे भूमीपूजन झाले नसले तरी कंपनीशी करार झाल्यानंतर कंपनीने खोटेनगरपासून या कामाला सुरुवात झाली आहे. सध्या साफसफाई व इतर कामे केले जात आहे. त्यामुळे एकदाचे काम सुरू झाले तेवढा मात्र शहरवासीयांना दिलासा आहे.


Web Title: Due to the 'Design' of the highway four-dimensional is left to be sanctioned,
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.