नागपूरवरून उपचारासाठी आलेले डॉक्टर्सनाही बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 01:22 PM2020-08-09T13:22:41+5:302020-08-09T13:23:08+5:30

जळगाव : कोविड रुग्णालयात सर्व सुविधा येत असताना, मोठ्या प्रमाणावर साहित्य येत असताना मनुष्यबळाचा मुद्दा मात्र पाठ सोडत नसल्याचे ...

Doctors from Nagpur also came for treatment | नागपूरवरून उपचारासाठी आलेले डॉक्टर्सनाही बाधा

नागपूरवरून उपचारासाठी आलेले डॉक्टर्सनाही बाधा

Next

जळगाव : कोविड रुग्णालयात सर्व सुविधा येत असताना, मोठ्या प्रमाणावर साहित्य येत असताना मनुष्यबळाचा मुद्दा मात्र पाठ सोडत नसल्याचे चित्र आहे़ नागपूर येथून रुग्णांवर उपचारासाठी आलेले तिन्ही डॉक्टर्स कोरोन बाधित झाले आहेत़ गेल्या काही दिवसांपासून त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे़ त्यामुळे सद्यस्थितीत कोविड रुग्णालयातील यंत्रणेतच संसर्ग वाढल्याचे चित्र आहे़
मनुष्यबळाचा मुद्दा सोडविण्यासाठी बाहेरी जिल्ह्यातून काही डॉक्टर्सना जळगावात पाठविण्यात आले आहे़ त्यात काही डॉक्टर्स परत गेले होते़ त्यात आठवडाभरापूर्वीच नागपूर येथून तीन डॉक्टर्स दाखल झाले होते़ त्यांचा रहिवास एकाच ठिकाणी होता़
अशा स्थितीत ते तिघेही गेल्या काही दिवसांपासून बाधित झाले व परतल्याची माहिती आहे़ या आधीही अनेक डॉक्टर्स व कर्मचारी बाधित झाले होते़ शिवाय गेल्या चार महिन्यांपासून सातत्याने काम करणाऱ्या डॉक्टरांवर प्रचंड ताण आला असून आता ड्युटी लावण्यावरूनही संतप्त प्रतिक्रिया समोर येत असल्याचे म्हटले जात आहे.
काहींनी तर थेट राजीनामा देण्याचाही इशारा दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे़ त्यामुळे मनुष्यबळ कमतरेतचा मुद्दा या रुग्णालयात कायम असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच मुख्य अडचण सोडविण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे़
अधिष्ठाता कार्यालयातील दोन कर्मचारी बाधित
अधिष्ठाता कार्यालयात कार्यरत दोन कर्मचाऱ्यांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले असून बाकी अन्य कर्मचाºयांनीही नमुने दिले असून त्यांचे अहवाल बाकी असल्याची माहिती आहे़ काही दिवसांपासून कर्मचारी बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे़

Web Title: Doctors from Nagpur also came for treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव