जिल्हा दूध संघातर्फे आज दूध संकलन बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 12:58 PM2020-03-30T12:58:20+5:302020-03-30T12:58:29+5:30

उठाव नाही : दररोज एक लाख लिटर दूध शिल्लक

District milk union stopped milk collection today | जिल्हा दूध संघातर्फे आज दूध संकलन बंद

जिल्हा दूध संघातर्फे आज दूध संकलन बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद असल्याने दुधाची मागणी घटून दररोज दूध शिल्लक राहत असल्याने जिल्हा दूध संघातर्फे 30 मार्च रोजी दूध संकलन बंद ठेवण्यात आले आहे
लॉकडाऊनमुळे सध्या दुधाची मागणी घटली असून यामुळे अगोदर 20 ते 30 हजार लिटर दुध दररोज शिल्लक राहत होते. नंतर हे प्रमाण 50 हजार लिटर, 85 हजार लिटर व आता 1 लाख लिटरवर पोहचले आहे. त्यामुळे 30 रोजी एक दिवस दूध संकलन बंद ठेवण्याचा निर्णय दूध संघाने घेतला आहे. 
दररोज दूध शिल्लक राहत असले तरी दूध पावडर तयार करण्यास कारखाने तयार नाही. त्यामुळे दररोज दूध शिल्लक राहत आहे, त्यामुळे राज्यातील इतर दूध संघाप्रमाणे जळगाव जिल्हा दूध संघानेही एक दिवस दूध संकलन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 


लॉकडाऊनमुळे दुधाची मागणी घटल्याने दूध शिल्लक राहत आहे, त्यामुळे 30 मार्च रोजी एक दिवस दूध संकलन बंद ठेवण्यात आले आहे
- मनोज लिमये, कार्यकारी संचालक, जिल्हा दूध संघ

 

Web Title: District milk union stopped milk collection today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.