सातपुड्यात ४५० जणांना फराळ व नवे कपडे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 02:41 PM2020-11-22T14:41:01+5:302020-11-22T14:41:08+5:30

जामुनझिरा येथे राबविला उपक्रम

Distribution of Faral and new clothes to 450 people in Satpuda | सातपुड्यात ४५० जणांना फराळ व नवे कपडे वाटप

सातपुड्यात ४५० जणांना फराळ व नवे कपडे वाटप

googlenewsNext


भुसावळ:-  अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे यावल तालुक्यातील जामुनझिरा येथे सामूहिक दिवाळी साजरी करण्यात आली. त्यात १२५ कुटुंबातील मुला-मुलींना नवीन कपडे, महिलांना साड्या, शैक्षणिक साहित्य,स्वच्छते साठी साबण आणि जिल्हा परिषद शाळेसाठी वाॅटर प्युरीफायर वाटप करण्यात आले.
दीपाेत्सवाच्या निमित्ताने अंतर्नाद तर्फे  गाेळा करण्यात आलेले साहित्य व फराळ यावल तालुक्यातील जामुनझिरा येथील आदिवासी पाड्यात वाटप करण्यात आला.
उपक्रमाचे दाते
रवींद्र निमाणी, नगरसेवक मुकेश पाटील, दिलीप सूर्यवंशी, युवराज लोणारी, प्रशांत तायडे, निलेश कोल्हे, ललित पाटील, हर्षद महाजन, किशोर पाटील, रघुनाथ सोनवणे, डॉ.नीलिमा नेहते, हरीश फालक, रमेश सरकटे, कांतीलाल पाटील, दशरथ पाटील, मंगलेश पाटील, श्रीकांत मोटे, ज्योती साठे, सरला पाटील, सुरेश न्हावकर, भाग्यश्री भंगाळे, सचिन पाचपांडे, रवि राजपूत, परिक्षीत बऱ्हाटे, प्रकाश कासार, क्रांती सुरवाडे, ज्ञानेश्वर मोरे, एच. टी. फेगडे, परिक्षीत चव्हाण, सलीम शेख, जे. डी. महंत, विजय सोनवणे, बी. एन. पाटील, पवन कलापुरे, नरेंद्र पाटील, महेंद्र किनगे, विकास वारके, संदिप पाटील, विलास बेंद्रे, दिलीप चौधरी, मयुर कोळी, शरद हिवरे, शरद गाढे, संदिप बोरोले, शशिकांत राणे, वसंत सोनवणे, प्रवीण पाटील, छाया पाटील,दिपक जावळे, विनोद चोरडीया, के टी तळेले या दात्यांचे सहकार्य लाभले. प्रकल्प प्रमुख योगेश इंगळे समन्वयक जीवन सपकाळे तर सह समन्वयक हरीश भट हे हाेते. श्रीकांत जाेशी,ज्ञानेश्वर घुले, देव सरकटे, प्रसन्ना बाेराेले,शशिकांत येवले, आरीफ तडवी, पांडुरंग महाजन, गणेश जावळे, समाधान जाधव, प्रदीप साेनवणे, जीवन महाजन, प्रा. श्याम दुसाने, संजय भटकर, निवृत्ती पाटील, भूषण झाेपे, मंगेश भावे,अमित चाैधरी, अमितकुमार पाटील, कुंदन वायकोळे, राजू वारके, हेमंत बोरोले, राजेंद्र जावळे, सचिन पाटील, तेजेंद्र महाजन, संदीप सपकाळे अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते. 
यावेळी चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलल्याचे  अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी सांगितले.  प्रकल्पप्रमुख योगेश इंगळे, समन्वयक जीवन सपकाळे, सह समन्वयक हरीश भट आदींंनी परिश्रम घेतले.

Web Title: Distribution of Faral and new clothes to 450 people in Satpuda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.