कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 08:06 PM2021-01-02T20:06:53+5:302021-01-02T20:07:34+5:30

डांगरी येथील आधार किसन कोळी (६५) या कर्जबाजारी शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना २ रोजी पहाटे घडली.

Debt-ridden farmer commits suicide | कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्देस्वतःच्या शेतात विष पिऊन संपवले जीवन

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : तालुक्यातील डांगरी येथील आधार किसन कोळी (६५) या कर्जबाजारी शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना २ रोजी पहाटे घडली.

आधार कोळी यांची डांगरी येथे ५ बिघे शेती असून त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती बँक पीक कर्ज व खाजगी कर्ज आहे. शेतीत उत्पन्न आले नाही आणि बँकेचे कर्ज फेडू शकले नाहीत, म्हणून त्यांनी शेतातच विषारी द्रव्य प्रश्न करून आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. 

त्यांच्या पश्चात पत्नी,  २ मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. किसन कोळी यांच्या खबरीवरून मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहेत.

Web Title: Debt-ridden farmer commits suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.