लोंबकळणारी केबल गळ्यात अडकून दुचाकीस्वार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 10:34 PM2020-08-01T22:34:58+5:302020-08-01T22:35:08+5:30

जळगाव : रस्त्यात लोंबकळणारी केबल दुचाकीस्वाराच्या गळ्यात अडकल्याने मनीष चंद्रकांत पांढारकर (२७, रा.वाघ नगर) हा तरुण जखमी झाल्याची घटना ...

The cyclist was injured when a hanging cable got stuck in his neck | लोंबकळणारी केबल गळ्यात अडकून दुचाकीस्वार जखमी

लोंबकळणारी केबल गळ्यात अडकून दुचाकीस्वार जखमी

Next

जळगाव : रस्त्यात लोंबकळणारी केबल दुचाकीस्वाराच्या गळ्यात अडकल्याने मनीष चंद्रकांत पांढारकर (२७, रा.वाघ नगर) हा तरुण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे दहा वाजता मू.जे.महाविद्यालयाच्या समोर घडली. मनीष याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मनीष हा बॅँकेच्या क्रेडीट कार्डचे काम करतो. शुक्रवारी काम आटोपल्यानंतर घरी जात असताना मू.जे.महाविद्यालयासमोर केबल लोंबकळत होती. अंधारामुळे दिसत नसल्याने मनीषच्या गळ्यात अडकली, त्यामुळे तो दुचाकीवरुन कोसळला. त्यात डोक्याला व चेहऱ्याला दुखापत झाली. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: The cyclist was injured when a hanging cable got stuck in his neck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.