दोन वर्षासाठी हद्दपार असलेल्या गुन्हेगारास कासमवाडीतून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 09:18 PM2020-09-25T21:18:14+5:302020-09-25T21:18:25+5:30

जळगाव : दोन वर्षांसाठी हद्दपारचे आदेश असताना शहरात वावरणा-या गुन्हेगारास एमआयडीसी पोलीसांनी कासमवाडीतील राहत्या घरातून अटक करण्यात आली. गौरव ...

Criminal arrested from Kasamwadi for two years | दोन वर्षासाठी हद्दपार असलेल्या गुन्हेगारास कासमवाडीतून अटक

दोन वर्षासाठी हद्दपार असलेल्या गुन्हेगारास कासमवाडीतून अटक

Next

जळगाव : दोन वर्षांसाठी हद्दपारचे आदेश असताना शहरात वावरणा-या गुन्हेगारास एमआयडीसी पोलीसांनी कासमवाडीतील राहत्या घरातून अटक करण्यात आली. गौरव भरत कुंवर (२३,रा. सप्तश्रृंगी मंदिराजवळ, कासमवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरूध्‍द हद्दपारीचे उल्लंघन केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कासमवाडी येथील रहिवासी गौरव कुंवर याला दोन वर्षांसाठी हद्दापार करण्‍यात आलेले आहे. परंतु, तो शहरात वावरत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. पोलीसांनी मध्यरात्री १ वाजता गौरव याचे कासमवाडीतील घर गाठले. त्यावेळी गौरव हा घराबाहेर दिसून येताच पोलिसांनी त्याला अटक केली. दरम्यान, त्याची चौकशी केले असता त्याने कुठलीही परवानगी नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे हद्दपारीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.

यांनी केली कारवाई
एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदशनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील,मुदस्सर काझी, हेमंत कळसकर, सचिन पाटील आणि चंद्रकांत बळीराम पाटील यांनी कारवाई करत मध्यरात्री १ वाजता संशयित आरोपी गौरव भरत कुंवर याला अटक केली.
 

Web Title: Criminal arrested from Kasamwadi for two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.