चाळीसगावला ५०० कुटुंंबांना नगरसेवक राजेंद्र चौधरी यांचा मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 04:28 PM2020-04-04T16:28:14+5:302020-04-04T16:34:06+5:30

मजूर कुटुंंबांची वेदना ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी यांना अस्वस्थ करून गेली. त्यांनी प्रभाग क्रमांक सातमध्ये गेल्या काही दिवसांपासून 'एक हात मदतीचा' उपक्रम राबवून मजुरांच्या चुली पुन्हा पेटवल्या आहेत.

Councilor Rajendra Chowdhury's help to 4 families in Chalisgaon | चाळीसगावला ५०० कुटुंंबांना नगरसेवक राजेंद्र चौधरी यांचा मदतीचा हात

चाळीसगावला ५०० कुटुंंबांना नगरसेवक राजेंद्र चौधरी यांचा मदतीचा हात

Next
ठळक मुद्देमजुरांना वितरित करताहेत किराणा सामानचाळीसगावच्या प्रभाग क्रमांक सातमधील मजूर कुटुंंबेरोजगार बुडालेल्यांना दिलासासामाजिक कृतज्ञता म्हणून मदत

चाळीसगाव, जि.जळगाव : गेल्या १० दिवसात त्यांच्या चुली पेटल्याच नाहीत... लॉकडाऊन असल्याने हाताला काम नाही... मजूर कुटुंंबांची वेदना ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी यांना अस्वस्थ करून गेली. त्यांनी प्रभाग क्रमांक सातमध्ये गेल्या काही दिवसांपासून 'एक हात मदतीचा' उपक्रम राबवून मजुरांच्या चुली पुन्हा पेटवल्या आहेत. ५०० कुटुंंबांना किराणा सामानाचे वाटप त्यांनी झोपडपट्टी भागात सुरू ठेवले आहे.
प्रभाग क्रमांक सातमध्ये मजूर वर्गाची संख्या मोठी आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने त्यांचा रोजगार गेला. वंचित घटकांची हीच स्थिती. गेल्या ३५ वषार्पासून नगरसेवक असणारे राजेंद्र चौधरी त्यांच्या मदतीसाठी धावून गेले. प्रभातील ५०० कुटुंंबांना त्यांनी जीवनाश्यक किराणा सामानाचे मोफत वाटप सुरू केले. विशेषत: मजुरांच्या परिवारात समाधानाचे वातावरण पसरले आहे.
सामाजिक जाण, मजुरांविषयी माणुसकी, नगरसेवकाचे दायित्व अशा भावनेतून आपण काम करतोय. आपत्तीच्या प्रसंगी गरजू गोरगरिबांना मदत करण्यासाठीच मोफत किराणा सामान वितरणाचा उपक्रम सुरू केल्याची प्रतिक्रिया यावेळी राजेंद्र चौधरी यांनी व्यक्त केली.
५०० कुटुंंबांना मदतीचा हात
प्रभागातील सर्वच मजूर कुटुंंबांचा शोध घेऊन त्यांना घरपोच गहू, तांदूळ, साखर,बिस्कीट व तिखट अशा जीवनावश्यक वस्तूंचा किराणा सामान वितरित केला. यासाठी राजेंद्र चौधरी व मित्र मंडळ परिश्रम घेत आहे.

Web Title: Councilor Rajendra Chowdhury's help to 4 families in Chalisgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.