शेतकऱ्यांच्या खात्यावर कापसाच्या रकमा जमा झाल्या डबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 09:49 PM2020-02-16T21:49:54+5:302020-02-16T21:52:25+5:30

तालुक्यातील दोनशे ते तीनशे शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात विकलेल्या कापसाचे पैसे काही दिवसांपूर्वी बँक खात्यात जमा झाले, पण विकलेल्या मालाच्या पैशांपेशा जास्तच पैसे आल्याने तालुक्यातील शेतकरी घाबरला आणि त्यांनी हा प्रकार ग्रेडरला सांगितला. मग बँकेत डबर एंट्री झाल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचे समजले.

Cotton deposits doubled on farmers' accounts | शेतकऱ्यांच्या खात्यावर कापसाच्या रकमा जमा झाल्या डबल

शेतकऱ्यांच्या खात्यावर कापसाच्या रकमा जमा झाल्या डबल

googlenewsNext
ठळक मुद्देपारोळा तालुक्यातील प्रकारसीसीआयच्या यादीत सुमारे पाच कोटी रू. जास्त

राकेश शिंदे
पारोळा, जि.जळगाव : तालुक्यातील दोनशे ते तीनशे शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात विकलेल्या कापसाचे पैसे काही दिवसांपूर्वी बँक खात्यात जमा झाले, पण विकलेल्या मालाच्या पैशांपेशा जास्तच पैसे आल्याने तालुक्यातील शेतकरी घाबरला आणि त्यांनी हा प्रकार ग्रेडरला सांगितला. मग बँकेत डबर एंट्री झाल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचे समजले.
शेतकरी कर्जबाजारी आहे. त्याला कर्ज फेडण्यासाठी पैसे हवा असतो. निसर्गाच्या भरवशावर आपली शेती करणारा शेतकरी आपल्या इमानाशी नेहमी प्रामाणिक आहे. याचे उदाहरण म्हणजे तालुक्यातील घडलेला प्रकार म्हणता येईल. जवळपास तिनशेवर शेतकºयांच्या बँक खात्यात कापसाचे पैसे दुप्पट पैसे जमा झाले. जानेवारी महिन्यात दिनांक १३, १६ व १७ रोजी पारोळा येथील बालाजी कोटेक्स येथे सीसीआयमार्फत कापूस विकला होता. त्याची यादी तयार करून जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणी दिली जाते. त्यानंतर औरंगाबाद येथे देण्यात आल्यानंतर अ‍ॅक्सिस बँकेकडून पैसे टाकण्यात येतात. हे पैसे १४ फेब्रुवारी रोजी शेतकºयांच्या खात्यात जमा झाले. पैसे पाहून शेतकरी अचंबित झाले.
कापसाचे पैसे दुप्पट जमा झाले. ते म्हणजे एक लाख रुपये कापसाची रक्कम असेल तर शेतकºयाच्या खात्यावर दोन लाख रुपये जमा झाले. ही बाब काही शेतकºयांनी ग्रेडर ए.जी. कदम यांच्या लक्षात आणून दिली व पैसे जादा जमा झाल्याचे सांगितले. यावर त्यांनी लगेच चौकशी केली. बँकेत डबल एंट्री झाली व पैसे डबल देण्यात आल्याचे समजले. साधारण अडीचशे ते तीनशे शेतकºयांच्या खात्यात सुमारे चार ते पाच कोटी रुपये टाकले गेल्याचा प्रकार घडला आहे.
बँकेच्या चुकीमुळे हा प्रकार घडला. ही बाब लक्षात येताच संबंधित शेतकºयांची बँक खाती तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली आहेत. दोन-तीन दिवसात हा आलेला जादा पैसा परत जाईल व बँकेची खाते पुन्हा सुरू करण्यात येतील. तसेच ज्या शेतकºयांकडून अनावधानाने पैसे काढले गेले आहेत. ते शेतकरी सोमवारी त्या बँकेला पुन्हा आरटीजीएस करणार असल्याचे ग्रेडर कदम यांनी सांगितले.

Web Title: Cotton deposits doubled on farmers' accounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.