साफसफाईच्या ठेक्यात १ कोटी २० लाखांचा भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 12:42 PM2020-07-09T12:42:17+5:302020-07-09T12:42:32+5:30

सुनील महाजन : पुराव्यानिशी नगरविकास मंत्र्यांकडे तक्रार करणार, ९५ टक्के हजेरी बोगस असल्याचा ठपका

Corruption of 1 crore 20 lakhs in cleaning contract | साफसफाईच्या ठेक्यात १ कोटी २० लाखांचा भ्रष्टाचार

साफसफाईच्या ठेक्यात १ कोटी २० लाखांचा भ्रष्टाचार

Next

जळगाव : मनपाच्या सत्ताधाऱ्यांनी सहा महिन्यांपासून वॉटरग्रेसचे काम थांबवून एस. के. कॉन्ट्रॅक्टरला शहराच्या साफसफाईचा ठेका दिला आहे. यासाठी मनपाने जवळपास २ कोटी. ४० लाख रूपये दिले आहेत. यासंदर्भात कागदपत्रांची तपासणी केली असता यामध्ये सत्ताधाऱ्यांचा सहभाग आहे. या ठेक्यात सुमारे १ कोटी २० लाखांचा भ्रष्ट्राचार झाला असल्याचा आरोप मनपाचे विरोधी पक्षनेते सुनिल महाजन यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेद्वारे केला आहे. तसेच या गैरव्यवहारा संदर्भात आपल्याकडे सर्व पुरावे असून, लॉकडाऊन संपल्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचेही सुनील महाजन यांनी सांगितले.
शिवसेनेचे महानगरध्यक्ष शरद तायडे यांच्या संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेला नगरसेवक विष्णू भंगाळे व महानगरध्यक्ष शरद तायडे उपस्थित होते. या पुढे सुनील महाजन यांनी सांगितले की, निविदा न काढताच हा ठेका देण्यात आला आहे. शासनाने घालून दिलेल्याअटी-शर्तीचा भंग झाला आहे. सत्ताधाºयांनी मनपाच्या निधीचा गैरवापर केला आहे. एका बाजूला कोरोनाच्या औषधांसाठी टेंडरचा घोळ तर दुसºया बाजूला कोरोनाच्या नावाखाली विनाटेंडर आर्थिक लूट केली आहे. सुरुवातीला एस. के. कॉन्ट्रॅक्टरला ठेका देतांना बांधकाम विभागाला ९ मजूर पुरविण्याचा ठेका दिला होता. मात्र, त्यानंतर साफसफाईच्या ठेक्यासाठी प्रशासनाची कुठलीही मंजुरी नसतांना सफाईसाठी ४०० व वाहनचालक म्हणून २५० कामगार असे एकूण ६५० कामगार पुरविण्याचा मक्ता दिला असल्याचेही महाजन यांनी सांगितले. तसेच मक्तेदाराने ९५ टक्के बोगस हजेरी दाखविली असून, यामध्ये काही नगरसेवकांच्या नातेवाईकांच्या नावाने बोगस हजेरी आढळून आल्या आहेत.


या ठेक्यामध्ये कुठलाही भ्रष्ट्राचार झालेला नाही. तसेच हा ठेका नियमानुसार आहे. वॉटरग्रेसच्या तुलनेत या ठेक्यामध्ये जवळजवळ तीन कोटी रुपये वाचले आहेत. शहरात साफसफाईदेखील चांगली आहे. वॉटरग्रेसला पर्याय म्हणून तात्पुरत्या स्वरूपात या ठेका दिला आहे. या ठेका रितसर आहे की अनियमितता झाली आहे, हे प्रशासन बघेल.
-भारती सोनवणे, महापौर.

विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांची नेमकी काय तक्रार आहे हे माहिती नाही, त्यांची तक्रार प्रशासनाकडे आली तर त्यावर चौकशी करता येईल.
-सतीश कुलकर्णी, आयुक्त, जळगाव मनपा.

सत्ताधाºयांचा आयुक्तांवर दबाव... विनानिविदा काढलेले एस. के. कॉन्ट्रॅक्टरचे टेंडर या पुढेही सुरू रहावे,यासाठी सत्ताधारी एका गटातर्फे आयुक्तांवर दबाव टाकण्यात येत असल्याचेही सुनिल महाजन यांनी सांगितले. या दबावातूनच मक्तेदाराने मनपाकडून प्रतिकामगार ५२० रूपये घेऊन महिला कामगारांना २०० रूपये व पुरूष कामगारांना २५० रूपये रोजदांरी देऊन उर्वरित रक्कमेचा गैरव्यवहार करत असल्याचा आरोपही महाजन यांनी केला.

 

Web Title: Corruption of 1 crore 20 lakhs in cleaning contract

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.