शहरात कोरोनाचा विस्फोट, ५५ नवे बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 11:59 AM2020-07-04T11:59:54+5:302020-07-04T12:00:19+5:30

तीन बाधितांचा मृत्यू : संसर्ग वाढला

Corona blast in the city, 55 newly affected | शहरात कोरोनाचा विस्फोट, ५५ नवे बाधित

शहरात कोरोनाचा विस्फोट, ५५ नवे बाधित

googlenewsNext

जळगाव : शहरात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढला असून शुक्रवारी शहरात तब्बल ५५ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे़ शहराची रुग्णसंख्या ८५१ वर पोहोचली आहे़ दरम्यान, तीन बाधितांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्याही ४८ झाली आहे़ शहरात वाढणारी गर्दी नियंत्रणात आणण्याची गरज असल्याचे मत यामुळे समोर येत आहे़

शुक्रवारी पुन्हा एकदा जिल्हाभरातील सर्वाधिक रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहे़ गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील रुग्णसंख्या अगदीच झपाट्याने वाढली असून कोरोनाचा कहर थांबत नसल्याचे चित्र आहे़ शहरातील विवेकानंद नगर नवे हॉटस्पॉट ठरत आहे़ यासह शिवाजीनगरात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे़ शहरातील सर्वच भागांमध्ये कोरोनाचा कमी अधिक प्रमाणात शिरकाव झालेला असून नागरिकांनी आता अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे़ शुक्रवारी शहरातील तीन बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ यात ५५, ७० व ५९ वर्षीय पुरूषांचा समावेश आहे़ शुक्रवारी जिल्हाभरातील सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद असून यातील ५ मृत्यू हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव तर एक मृत्यू गोल्डसिटी रुग्णालयात झाला आहे़ मृतांमध्ये जळगाव शहर ३, बोदवड एक ५५ वर्षीय प्रौढ, पाचोरा व जामनेर येथील अनुक्रमे ४० व ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे़
जिल्ह्यातील रहिवासी असलेले मात्र, अन्य जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची नोंद ही आपल्या जिल्ह्यातील फॅसिलिटी अ‍ॅपमध्ये करता येत नाही़ रुग्ण ज्या जिल्ह्यात बाधित आढळून आलेला असून मृत्यू झालेला आहे, त्या जिल्ह्यातील अ‍ॅपमध्येच ही नोंद होते़ ११ रुग्णांचा मृत्यू हा बाहेर जिल्ह्यात झाल्यामुळे ती नोंद त्याच जिल्ह्यात करण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण सामान्य जिल्हा रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे़

या ठिकाणी आढळले रुग्ण
विवेकानंद नगर, शिवाजी नगर प्रत्येकी ५, हिरा शिवा कॉलनी २, तुकाराम वाडी, गेंदालाल मिल, मयूर कॉलनी, जीवनमोती सोसायटी शिरसोली रोड, गणेश नगर, आदर्श नगर या ठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले असून अन्य रुग्णांच्या घराचे पत्ते समोर आले नव्हते़

तपासणी वाढल्याने रुग्ण येताय समोर
जिल्हाभरात तपासणींची संख्या वाढविण्यात आली असून अहवाल येण्याचे प्रमाणही वाढल्याचे चित्र आहे़ शुक्रवारी एका दिवसातील सर्वाधिक रुग्ण आढळून आले मात्र, दुसरीकडे ६५६ अहवाल निगेटीव्हही आलेले आहेत़ असे एकूण ८६५ अहवाल एका दिवसात प्रशासनाला प्राप्त झाले असून शुक्रवारी पुन्हा ८५४ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे़

Web Title: Corona blast in the city, 55 newly affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.