जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक उतरले थेट नदीपात्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 08:25 PM2020-11-24T20:25:18+5:302020-11-24T20:25:43+5:30

चोरट्या मार्गाचीही पाहणी : अवैध वाळूवर नजर

Collector, Superintendent of Police landed directly in the river basin | जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक उतरले थेट नदीपात्रात

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक उतरले थेट नदीपात्रात

Next

जळगाव : गिरणा पदी पात्रातून होणारी बेसुमार अवैध वाळू वाहतूक पाहता याला लगाम घालण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे सोमवारी सायंकाळी थेट निमखेडी परिसरातील नदीपात्रात उतरले होते. त्यांच्यासमवेत प्रांताधिकारी व तहसीलदार देखील होते. यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांनी कोणत्या पात्रातून केव्हा वाळूचा उपसा होतो, कोणत्या मार्गावरुन त्याची वाहतूक होते. चोरटे मार्ग कोणते याची पाहणी करण्यासह नदीपात्रात काही जणांकडून माहीती जाणून घेतली. यावेळी रस्त्यात एक डंपर आढळून आले, ते जप्त करण्यात आले आहे.

जिल्हाभरातील वाळू गटांचा लिलाव झालेला नाही. असे असतांनाही मोठ्या प्रमाणावर सर्रासपणे अवैधपणे वाळू वाहतूक होत आहे. दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी नाकाबंदी करण्यात आली होती, त्यात वाहनांच्या तपासणीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाळूची वाहतूक करणारे डंपर पकडून चालक व मालकाविरुध्द गुन्हा दाखल केला होता. अवैध वाळू वाहतुकीवर कायमचा आळा बसावा, महसूलात वाढ व्हावी, असे आदेशही नुकतेच विभागीय आयुक्तांकडून जिल्हाप्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच अवैध वाळू वाहुकीबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे काही तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या.

या दोन्ही गोष्टींना अनुसरुन जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे सोमवारी सायंकाळी साडे चार वाजता अचानकपणे गिरणा नदी परिसरातील खेडी, आव्हाणे तसेच निमखेडी या शिवारातील नदीपात्रात धडकले. यावेळी अधिकारी थेट नदीपात्रात उतरुन नेमकी कुठून व कशा पध्दतीने वाळू उपसा होतो. कोणत्या मार्गाने वाहने नदीपात्रात उतरतात व वाळू भरल्यानंतर कोणत्या चोरट्या मार्गांनी वाहतूक करतात याबाबत माहिती घेतली. यावेळी प्रांतधिकारी प्रसाद मते, तहसीलदार नामदेव पाटील, तलाठी यांचीही उपस्थिती होती. जिल्हाधिकाऱ्यांना नदीपात्रात काही डंपरही दिसून आले. मात्र त्यात वाळू नव्हती. याबाबत संबंधित पोलीस ठाण्याला कारवाईच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

Web Title: Collector, Superintendent of Police landed directly in the river basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.