चाळीसगावात उपचार घेणारा निघाला ‘कोरोना’ पॉझिटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 09:21 PM2020-05-11T21:21:44+5:302020-05-11T21:24:03+5:30

कोरोनामुळे चाळीसगाव येथील रुग्णालयाचा परिसर सील करण्यात आला आहे.

In Chalisgaon, the treatment went 'Corona' positive | चाळीसगावात उपचार घेणारा निघाला ‘कोरोना’ पॉझिटीव्ह

चाळीसगावात उपचार घेणारा निघाला ‘कोरोना’ पॉझिटीव्ह

googlenewsNext
ठळक मुद्देखासगी रुग्णालयाचा परिसर केला सीलरुग्ण नांदगाव तालुक्यातील अमोदे येथील१३ रुग्ण, डॉक्टर व पाच कर्मचारी होम क्वॉरंटाईनआज घेणार नमुने

जिजाबराव वाघ
चाळीसगाव, जि.जळगाव : लक्ष्मी नगरातील खासगी रुग्णालयात उपचार घेणारा ५५ वर्षीय रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर रुग्णालयाचा परिसर सील करण्यात आला आहे. या रुग्णालयातील दवाखान्यातील १३ रुग्ण, डॉक्टर व पाच कर्मचारी यांना संशयित म्हणून होम क्वॉरंटाईन करण्यात आले.
लक्ष्मीनगरस्थित खाजगी रुग्णालयात अमोदे येथील ५५ वर्षीय रुग्ण छातीत दुखत असल्याने शुक्रवारी उपचारासाठी दाखल होता. सोमवारी त्याच्या छातीत जास्त दुखू लागल्याने त्याला नाशिक येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र तेथे त्याची ‘कोरोना’ टेस्ट घेतली असता ती पॉझिटीव्ह आली.
प्रशासनाला ही बाब कळताच चाळीसगाव येथील रुग्णालयाचा संपूर्ण परिसर तातडीने सील करण्यात आला. सायंकाळी साडे सात वाजता तहसीलदार अमोल मोरे, ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ.बी.पी.बाविस्कर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराम लांडे, पो. नि. विजयकुमार ठाकुरवाड यांनी रुग्णालयाचा ताबा घेऊन तातडीने परिसर निर्जंतुकीकरण केला. रुग्णालयातील सर्वांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

डॉक्टरांसह १३ संशयित होम क्वॉरंटाईन
प्रशासनाने तत्काळ रुग्णालय परिसरात येऊन डॉक्टरांसह कर्मचारी व रुग्ण मिळून १४ संशयितांना होम क्वॉरंटाईन केले आहे.

सीमेवरील गस्तीवर प्रश्नचिन्ह
टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यातही चाळीसगाव कोरोना मुक्त आहे. सीमेलगत कोरोनाचे डेंजर झोन तयार झाले असतानाही चाळीसगाव सुरक्षित होते. बाधित झालेला रुग्ण अमोदे येथे सीमाबंदीची गस्त असताना चाळीसगावी उपचार घेण्यासाठी आलाच कसा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याला रुग्णालयात आणताना प्रवासाची परवानगी घेण्यात आली होती का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे सीमे पलिकडूनच चाळीसगाव परिसरात कोरोनाचा शिरकाव होण्याची शक्यता बळावल्याने चिंता व्यक्त होत आहे. पाचही सीमांवर गस्त अधिक कडक करण्यात यावी, अशी सर्वस्तरातून मागणी होत आहे.

१९ संशयित होम क्वॉरंटाईन
रुग्णालयात असणारे १३ रुग्ण, डॉक्टर व पाच कर्मचारी यांना संशयित म्हणून होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यांचेमंगळवारी सकाळी १० वाजता तपासणीसाठी नमुने घेण्यात येणार आहेत. ते तपासणीसाठी धुळ्याला पाठविले जाणार असल्याची माहिती डॉ.बी.पी.बाविस्कर यांनी 'लोकमत'ला दिली.

Web Title: In Chalisgaon, the treatment went 'Corona' positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.