चाळीसगाव बाजार समिती 'लॉक ओपन'नंतरच धान्य खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 07:11 PM2020-04-03T19:11:03+5:302020-04-03T19:12:27+5:30

चाळीसगाव बाजार समितीमधील खरेदीदार संघटनेनेदेखील 'लॉक ओपन'नंतरच माल खरेदी करण्याची भूमिका घेतली आहे.

The Chalisgaon Market Committee procured the grain only after 'lock open' | चाळीसगाव बाजार समिती 'लॉक ओपन'नंतरच धान्य खरेदी

चाळीसगाव बाजार समिती 'लॉक ओपन'नंतरच धान्य खरेदी

Next
ठळक मुद्देचाळीसगावात आडत व्यापाऱ्यांची भूमिका१४ नंतर निर्णय घेणारशेतकऱ्यांनी विक्रीसाठी माल न आणण्याची सूचना

जिजाबराव वाघ
चाळीसगाव, जि.जळगाव : अवकाळी मार सहन करूनही हाती लागलेल्या रब्बी हंगामाचे पाऊल बाजार समित्यांच्या प्रवेशव्दारावर थांबणार आहे. कारण स्पष्ट 'लॉकडाऊन...' चाळीसगावबाजार समितीमधील खरेदीदार संघटनेनेदेखील 'लॉक ओपन'नंतरच माल खरेदी करण्याची भूमिका घेतली आहे. बाजार समिती व्यवस्थापनाने विक्रीसाठी शेतमाल न आणण्याची सूचना केली असली तरी दोघीही बाजूने 'कोंडी' शेतकºयांचीच होणार आहे.
'कोरोना' संसर्गजन्य टाळण्यासाठी देशात २१ दिवसांची संचारबंदी आहे. यामुळे बाजार समितीही लॉकडाऊन असल्याने यावर्षी उत्पादीत झालेला रब्बी हंगामातील शेतमाल विक्रीसाठी कुठे घेऊन जायचा, असा कळीचा प्रश्न शेतकºयांसमोर उभा ठाकला आहे.
यावर्षी पावसाचे वेळापत्रक चांगले राहिल्याने सर्वत्र 'पाणी आबादानी' आहे. यामुळे यावर्षी रब्बी हंगाम चांगलाच बहरला. सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान झाल्याने गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आदी पिकांचे जोमदार उत्पन्न हाती येत आहे. शेतकºयांना लॉकडाऊनच्या काळात हाती पैसा येण्यासाठी शेतमाल विकणे गरजेचे आहे. एकीकडे हाती आलेले उत्पन्न आणि दुसरीकडे बाजार समितीचे दरवाजे बंद. अशा विचित्र कात्रीत शेतकरी अडकला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी लोकप्रतिनिधींनी ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकºयांमध्ये उद्रेकाची स्थिती उदभवणाचे चित्र आहे.
आडत व्यापारी म्हणतात, आमची भूमिका शेतकरी हिताची
३१ रोजी चाळीसगाव बाजार समिती खरेदीदार संघटनेचे अध्यक्ष बन्सीलाल छोरिया यांच्यासह ५० आडत व्यापा-यांची सभापती सरदारसिंग राजपूत, उपसभापती किशोर पाटील यांच्यासह संचालक मंडळाच्या उपस्थित बैठक पार पडली.
बाजार समिती व्यवस्थापनाने आडत व्यापाºयांना शेतमाल खरेदी करण्याची विनंती केली. मात्र कोरोना आजाराची पार्श्वभूमी, शेतकºयांची होणारी गर्दी, पेमेंट करण्यासाठी पैशांची उपलब्धता, सोशल डिस्टींगचा उद्भवणारा प्रश्न आदी कारणे पुढे करीत १४ नंतरच शेतमाल खरेदी करण्याचा निर्णय घेतला. आमची भूमिका शेतकरी हिताची आहे, असे खरेदीदार संघटनेचे अध्यक्ष बन्सीलाल छोरिया यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
शेतकºयांची कोंडी
खरीप हंगामात अति पावसाचा फटका बसलेल्या शेतकºयांची दारोमदार रब्बी हंगामावर आहे. यावर्षी रब्बीचे उत्पन्न चांगले आले असून शेतमालाची विक्री करुन शेतकºयांना तोंडावर आलेल्या खरीपासाठी कंबर कसायची आहे. मात्र लॉकडाऊनमुळे त्याची पुरती कोंडी झाली आहे. बाजार समितीत सध्या धान्य लिलाव बंद आहे. गत आठवड्यात कांद्याचे लिलावही थांबविण्यात आले आहे. भाजीपाल्याचे लिलाव मात्र नियमितपणे सुरू आहे.

 

Web Title: The Chalisgaon Market Committee procured the grain only after 'lock open'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.