भडगावात सात हजार दीव्यांचा दीपोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 05:37 PM2019-11-01T17:37:14+5:302019-11-01T17:38:31+5:30

भडगाव येथील श्री दत्त देवस्थान उर्फ अवधूत मढी येथे सात हजार दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला.

A celebration of seven thousand lamps in Bhadgaon | भडगावात सात हजार दीव्यांचा दीपोत्सव

भडगावात सात हजार दीव्यांचा दीपोत्सव

Next
ठळक मुद्देश्री दत्त देवस्थान उर्फ अवधूत मढी येथे उपक्रमभाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी होतो कार्यक्रम

अशोक परदेशी
भडगाव, जि.जळगाव : येथील श्री दत्त देवस्थान उर्फ अवधूत मढी येथे दर सालाबादाप्रमाणे यंदाही गुरुवारी सात हजार दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक डॉ.विजयकुमार देशमुख, केशवसुत ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष विजय देशपांडे, विश्वस्त डॉ.ईश्वरसिंग परदेशी, विश्वस्त जनार्दन दातार, डॉ.दुर्गेश रुले, गणेश मालपुरे, रघू पाटील, सचिन दाभाडे, संजय पाटील आदी उपस्थित होते.
श्री क्षेत्र पंत बाळेकुंद्री बेळगाव येथून सन २००८ साली श्री दत्त मढी भडगाव येथे पायी ज्योत आणण्यात आली. तेव्हापासून हा दीपोत्सव सुरू करण्यात आला. या उत्सवासाठी जळगाव जिल्ह्यासह इतर भागातून ही मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. या दिवसासाठी अवधूत मढी ट्रस्ट अध्यक्ष व प्रतिष्ठानचे गादीपती ह.भ.प. मिलिंद महाराज दातार भडगावकर यांचे मार्गदर्शन लाभले.
भाऊबीज सणानंतर येणाºया पहिल्या गुरुवारी हा दीपोत्सव साजरा करण्यात येतो. यंदा या दीपोत्सवासाठी सात हजार दिव्यांची रोशणाई करण्यात आली होती. मंदिरासह परिसराचे मनमोहक दृश्य अनेकांना आपल्या मोबाइलमध्ये कैद करण्याचा मोह मात्र आवरता आला नाही. या मनमोहक दृश्याने अनेकांच्या डोळ्याचे पारणे फिटले.

Web Title: A celebration of seven thousand lamps in Bhadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.